लहान मुलं फारच गोंडस असतात. सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. त्यातच जर या व्हिडीओमध्ये कुत्र्याच्या पिल्लांचाही समावेश असेल तर हे व्हिडीओ आवडीने आणि वारंवार पाहिले जातात. कुत्र्याला माणसाचा सर्वात प्रामाणिक मित्र म्हटले जाते. पण सध्या सोशल मीडियावर याउलट एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका चिमुकलीचे लक्ष विचलित करणाऱ्या एका लहान पिल्लाचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यामागे एक खास कारण आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्युबिटी पेजद्वारे शेअर केलाअसून त्याला २ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडीओमध्ये, लहान मुलगी हातात लॉलीपॉप घेऊन चालताना दिसत आहे, तर एक गोंडस पिल्लू तिचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओ जसजसा पुढे जातो, तसतसे पिल्लू तिच्या हातातून लॉलीपॉप चोरण्याचा सतत प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आणि शेवटी ते पिल्लू यशस्वी होते आणि त्या चिमुरडीला रडू कोसळते.
२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअॅक्शन व्हायरल
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की कुत्र्याचे पिल्लू चतुराईने लहान मुलीचे क्षणभर लक्ष विचलित करते ज्यामुळे ती तिचे लॉलीपॉप खाली टाकते, जे नंतर कुत्रा तिच्याकडून चोरतो आणि पळून जातो. यामुळे चिमुकलीला रडू येते, पिल्लू मात्र आनंदाने शेपूट हलवताना दिसते. नेटिझन्सना हा व्हिडीओ फारच आवडला असून त्यांनी या व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.