Sweet season of mangoes : आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला आहे. गौतम गंभीरचा लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हकने जबरदस्त गोलंदाजी केली. फलंदाजी करताना संपूर्ण संघ अपयशी ठरला आहे. यासह या संघाचे विजेतेपदाचे स्वप्नही अपूर्ण राहिले. आपल्या चमकदार कामगिरीनंतरही, विराट कोहलीशी भांडण करणारा नवीन-उल-हक त्याच्या Sweet season of mangoes”! कमेंटमुळे ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर आंब्याचा फोटो शेअर करून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवीनची खिल्ली उडवली आहे.
का सुरू झाला हा Sweet season of mangoes ट्रेंड
खरे तर या मीम्स वॉरची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा त्याचा विराट कोहलीसोबत वाद झाला. त्यानंतर आरसीबी स्पर्धेतून बाद झाल्यानंतर नवीनने इन्स्टाग्रामवर आंबे खातानाचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या तीन खेळाडूंनी आंब्याचा फोटो पोस्ट करून नवीन-उल-हकला प्रत्युतर दिले. सध्या हे मीम्स-वॉर सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू आहे.
‘चांगली कामगिरी करुनही नवीन उल हक का होतोय ट्रोल?
लखनऊकडून नवीन-उल-हकने सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मात्र, त्याने चार षटकांत ३८ धावाही दिल्या. कर्णधार रोहित शर्मापासून ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनच्या विकेट्स नवीनने घेतल्या आहेत. केवळ त्याच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला IPL 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात २०० च्या पुढे धावा काढता आल्या नाहीत. लखनऊ सुपर जायंट्सला मिळालेली ही दुसरा संधी होती, जेव्हा ही टीम प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतरही ट्रॉफी जिंकू शकली नाही.
मुंबई इंडियन्सच्या खेळांडूनी नवीनला दिले प्रत्युत्तर
त्यानंतर बुधवारी जेव्हा लखनऊ टीम स्पर्धेतेून बाहेर पडल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संदीप वॉरियर, विष्णू विनोद आणि कुमार कार्तिकेय या तीन खेळाडूंनी नवीन-उल-हकला धडा शिकविला आहे. त्यांनी आंब्याचे फोटो पोस्ट शेअर करून गांधीजींच्या तीन माकडांची पोज दिली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे नवीन-उल-हकला वाईट बोलू नये, वाईट बघू नये आणि वाईट ऐकू नये असा सल्ला दिला आहे.
आंब्याच्या फोटोवरुन मीम्स व्हायरल
नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती; मात्र काही लोकांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट घेतला होता. सोशल मीडियावर हा स्क्रीन शॉट पोस्ट करून लोक नवीन-उल-हकला ट्रोल करीत आहे.
हेही वाचा – Viral Video: कोरिअन व्यक्तीची बिहारी ऐकून थक्क झाले नेटकरी; म्हणाले, ”हा तर…”
एकाने कमेट केली आहे की, ”अहो नवीन, हे गोड आंबे घ्या. विराट कोहली कमाल आहे, तुम्हाला तुमचे कर्माचे फळ नक्कीच मिळेल.”
एकाने मीम्स शेअर केले आहे ज्यामध्ये नवीन आंब्याची विक्री करताना दिसत आहे, फोटोवर लिहिले आहे की, मुंबईकडून हरल्यानंतर नवीनने आंब्याचा व्यवसाय सुरू केला आहे.”
काने अशी कमेंट केली आहे की ”एक किलो आंब्याची कोय नवीनला पाठवा.”
हेही वाचा – तरुण राहण्यासाठी कायपण! आपल्याचा मुलासोबत रक्ताची आदला-बदली करतो हा व्यक्ती, कोट्यावधी रुपये करतो खर्च
तसेच नवीन उल हक याची Sweet season of mangoes”! वर प्रतिक्रिया कशी असे याची झलक देखील नेटकऱ्यांनी दाखवली आहे. एका यूजरने नवीनचा एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो कानामध्ये बोट घालून मैदानावर उभा आहे. या फोटोत तो Sweet mangoes ऐकून तो वैतागला आहे असे दिसते.
दरम्यान LSGने या मँगो, आम, मँगोज, आंबा, असे शब्द त्यांच्या अकाऊंटवर म्युट केले आहेत