Madhya Pradesh Chaddi Chor Gang : चोरट्यांनी आतापर्यंत सोनं, चांदी आणि पैसे चोरून पळ काढल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. पण, मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये चोर अशा काही गोष्टी घेऊन पळ काढतोय, जे पाहून नागरिकही अवाक् झालेत. चोर सोनं, पैसे नाही तर लोकांच्या घराबाहेर दोरीवर सुकत घातलेले अंडरगारमेंट चोरून पळ काढत आहे. या अनोख्या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी अंडरगारमेंट चोरीच्या घटनेबाबत ग्रामस्थांनी पाम नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी एका चोरट्याला पकडून त्याची रवानगी तुरुंगात केली. मात्र, शहरात अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी आता दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच जबलपूर, विजयनगर (शहरी) आणि पानगर (ग्रामीण) या दोन ठिकाणी अंडरगारमेंट चोरीच्या घटना घडल्या आहेत. एक प्रकरण जबलपूरच्या पानगर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील बिलगवान गावाशी संबंधित आहे. याप्रकरणी एक महिला आणि इतर गावकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रार देताना फिर्यादीने सांगितले की, चोरट्याने एकाच रात्री अनेक घरातील अंडरगारमेंट चोरल्या.

pune porsh car accident
पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव? सुनील टिंगरे यांनी संपूर्ण घटनाक्रमच मांडला!
Why Israel compassion for Hamas war victims cost lives
युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?
Ghatkopar hoarding collapse marathi news
फलक लावण्यात येणाऱ्या जागेच्या स्थैर्याचा मुद्दा दुर्लक्षितच, घाटकोपरच्या घटनेनंतर मुद्दा उपस्थित
Maternity leave
पहिल्या दोन लग्नांपासून महिलेला दोन मुलं, तिसऱ्या अपत्यासाठी प्रसूती रजा मिळेल का? उच्च न्यायालयानं केली महत्त्वपूर्ण टिप्पणी!
man jumps into lake after being fed up with expenses of daughters treatment
मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…
Unnatural intercourse, husband,
पतीने अनैसर्गिक संभोग करणे गुन्हा नाही; कायद्याने अशी मोकळीक मिळणे धोकादायक
do you have Leg Cramps in night
Video : रात्री झोपताना खूप पाय दुखतात? मग हे व्यायाम करा, व्हिडीओ एकदा बघाच
treadmill
VIDEO : बाप आहे की हैवान? फिटनेसच्या हव्यासाने घेतला पोटच्या मुलाचा जीव, ट्रेडमिल मशिनवर पळवलं अन्…

यानंतर अशीच घटना विजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात तोंडावर कपडा गुंडाळलेला एक चोर आजूबाजूला कोणी बघत तर नाही हे पाहून मग घराबाहेरील भिंतीवर सुकत टाकलेली अंडरगारमेंट चोरी करताना दिसत आहे. विजयनगर भागातील रहिवासी कल्पित सरोगी यांच्या म्हणण्यानुसार, तोंडावर कपडा गुंडाळलेला एक व्यक्ती स्कूटीवरून त्यांच्या घराजवळ आला आणि काही वेळाने तो अंडरवियर चोरून पळाला. यापूर्वीही अशीच घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल

पानगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गावकऱ्यांच्या तक्रारीवरून कारवाई करत टोळीतील एक सदस्य विजय ठाकूर ऊर्फ ​​लालू ठाकूर याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, तो अशाप्रकारे अंडरविअर चोरतो आणि फाडून फेकतो. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे अनेक कपडेही जप्त केले आहेत. आरोपीवर यापूर्वी चोरी आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.