Maharashtra Board Exam 2023:महाराष्ट्र सरकारने कॉपीमुक्त परीक्षा मोहीम राबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रांच्या ५० मीटरच्या आतील फोटोकॉपीची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक भरारी पथक असणार आहे. ताच परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदी असेल.

( हे ही वाचा: भारतात ‘हा’ आहे सर्वात लहान रेल्वे मार्ग; अवघ्या ९ मिनिटांत संपतो प्रवास..)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षेदरम्यान १०० मीटरपर्यंतच्या परिसरात असणारी सर्व फोटोकॉपी दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिथेच, परीक्षा केंद्रांभोवती पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्त आणि समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.