Dharashiv Blue Color Water: कित्येक दिवसांपासून आतुरतेने पावासाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळाधर पाऊस पडला. एकीकडे पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील म्हसळा गावातील धक्कादायक घटनेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुसळधार पावसानंतर शेतात वीज पडली आणि निळ्या रंगाचे पाणी वाहू लागले. स्थानिकांनी व्हिडिओ या घटनेचे व्हिडीओ शुट करून सोशल मीडियावर पोस्ट केले. अल्पावधीच हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गावकऱ्यांमध्ये निळे पाणी पाहून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर हा व्हिडिओ जितेंद्र @jitendrazavar यांनी पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शमध्ये लिहिले की, “धारशिवमधील शेतात निळे पाणी येत आहे. हे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे” निळे पाणी पाहून व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या. एकाने कमेंटमध्ये लिहिले, “रॉकेल असेल” तर दुसर म्हणाला, ते कॉपर सल्फेट असावे.

हेही वाचा – चिलीम-तंबाखू,शिरा-पुरी की खांब-खांब, तुम्ही या खेळाला काय म्हणायचा? Viral Video पाहून बालपणीच्या आठवणी होतील जाग्या

मुसळधार पावसानंतर निळ्या रंगाच्या पाण्याच्या प्रवाह पाहून गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या निळ्या पाण्याच्या प्रवाहाचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावात बघ्यांची गर्दी झाली होती. वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी का वाहू लागले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

निळ्या रंगाच्या पाण्याचे सत्य?

दरम्यान या घटनेची सत्यता पडतळणाऱ्यासाठी तलाठी आणि गावकऱ्यांनी जागेची तपासणी केली. जागेच्या तपासणीत हे निळ्या रंगाचे पाणी नैसर्गिक घटना नसल्याचे स्पष्ट झाले. पाहणीमध्ये निळ्या रंगाचे पाणी असलेल्या ठिकाणी काही कचऱ्याचे डबे दिसू आले ज्यामध्ये निळा रंग आढळला. एका अधिकाऱ्याने एबीपी माझाला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, निळ्या रंगाचे पाणी जिथे होते तिथे रंगाची पेटी चुकून पडली आणि पावसाच्या पाण्यात मिसळली, त्यामुळे पाण्याचा रंग बदलला.”

हेही वाचा –आनंद महिंद्रा यांनी भारतीय संघावर ‘गंभीर क्रूरतेचा’ आरोप करत दिली शिक्षा, कारण ऐकून बसेल धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुळजापूर तहसीलच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘परिसरात विजा पडल्याचा वृत्त आहे, पण निळ्या रंगाचे पाणी वाहते आहे हे पावसाचे पाणी निळ्या रंगाच्या डब्यामध्ये असलेल्या वस्तूमध्ये पाणी मिसळल्याने झाले आहे. “