सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कधी कुणी कारला हेलिकॉप्टर बनवतो; तर कधी कुणी जुगाड करून विटांपासून कूलर बनवतो. आता असाच एक नवा जुगाड व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने बाईकचा असा काही जुगाड केला आहे की, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. एका व्यक्तीने अशक्य काम शक्य करून दाखवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा जुगाड व्हिडिओ तुम्हालाही आवडेल आणि त्यातील व्यक्तीचे तुम्हीदेखील कौतुक करताना थकणार नाही. कारण या व्यक्तीने अशी एक बाईक तयार केली आहे की, जी कधी पाण्यात; तर कधी रस्त्यावर वेगाने धावू शकते. अशा या अनोख्या बाईकची कुणीही कल्पना करू शकत नाही.

या व्यक्तीचा हा देसी जुगाड पाहून लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला आहे. ट्विटरवर @pareekhjain नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बाईक कम बोट (Bike Cum Boat) असे लिहिले आहे. १९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती काळ्या रंगाच्या तीन चाकी वाहनावर बसलेली दिसत आहे. त्यानंतर तो हँडल धरून खेचतो आणि अगदी आरामात सीटवर झोपतो. या बाईक कम बोटवर सावलीसाठी कव्हरही देण्यात आले आहे, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, ती व्यक्ती बाईकला आधी बोट बनवते आणि पाण्यात चालवायला लागते. त्यानंतर तो तीच गाडी पाण्यातून बाहेर येऊन येतो आणि शेतात चालवतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा जुगाड बघून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त करत त्या व्यक्तीची प्रशंसा केली आहे. १६ जून रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ तीन हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, चिनी लोक आमच्यापेक्षा जास्त जुगाडू आहेत. आणखी एका युजरने लिहिले- पावसाळ्यात भारतातील अनेक शहरांमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. पण या व्हिडिओबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.