तुम्ही आतापर्यंत बाइक चालवतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. जुगाड करून तयार केलेल्या बाइकही पाहिल्या असतील पण तुम्ही कधी कोणाला बाईक डोक्यावर उचलेले पाहिले आहे का? व्हायरल व्हिडीओमध्ये सोशल मीडियावर लोकांचे एकापेक्षा एक टॅलेंट पाहायला मिळत आहे. आता अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो काही सेंकादामध्ये बाइक डोक्यावर उचलतो आणि बसवर चढवतो. व्हिडीओ पाहून लोक त्याला ” हा खरा बाहूबली आहे” असे म्हणत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, “एका व्यक्तीने बाईक चक्क डोक्यावर उचलून घेतली आहे आणि तो थेट बसला टेकवलेल्या शिडीवर चढताना दिसत आहे. बसच्या छतावर दोन व्यक्ती उभे आहेत. त्यांच्यापर्यंत हळू हळू शिडी वरून चढत हा व्यक्ती बाईक पोहचवतो. त्यानंतर ते बाइक पकडून छतावर ठेवतात.”

हेही वाचा – तीन मांजरीच्या तावडीत सापडली ‘इवलीशी चिमणी’; जीव वाचवण्यासाठी लढवली जबरदस्त शक्कल! पाहा Viral Video

या बाईकचे वजन अंदाजे १२८ किलो असल्याचे सांगितले जात आहे. जितक्या सहज या व्यक्तीने बाइक डोक्यावर घेऊन बसवर चढवली आहे हे पाहिल्यानंतर लोक त्याचे कौतूक करत आहे. तो खऱ्या आयुष्यातील बाहूबली आहे असेही लोकांचे म्हणणे आहे. व्हिडीओ @gharami.gautam नावाच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

हेही वाचा – नाश्ता केला नाही तर वजन वाढेल का? नाश्ता वगळण्याचा शरीरावर काय होतो परिणाम? काय सांगतात आहारतज्ज्ञ, जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया
एकाने लिहिले, धरतीवरील सर्वात मोठा बाहूबली हिरो हाच आहे. दुसऱ्याने लिहिले की, “हा मजुराचा हात आहे, लोखंड वितळवून आकार बदलू शकतो.” तिसऱ्याने सांगितले की, “त्याच्या हिंमतीचे कौतुक तर करावेल लागेल” आणखी एकाने लिहिले की, त्या व्यक्तीचा जीव धोक्यात टाकला जात आहे. जर त्याच्या “मानेवर किंवा मनक्याच्या हाडाला दुखापत झाली तर त्याची काळजी कोण घेईल?”

एकजण म्हणतो, “घरची परिस्थिती आणि जबाबदारीची ताकद आहे भाऊ!” दुसरा म्हणतो, “हा बिहारमधील सर्वात दुबळा व्यक्ती आहे,शक्तिशाली नाही.” तिसरा म्हणाला, “तो बाइक उचलू शकतो तो ती चालवू शकत नाही जो चालवू शकतो तो उचलू शकत नाही.”