Viral Video: मेकअप म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. मेकअप ही अशी गोष्ट आहे की, जिच्या मदतीने कोणीही सहज सुंदर दिसू शकते. पण, या मेकअपची ताकद आता केवळ महिलांना सुंदर बनवीत नाही, तर एका तरुणाने या मेकअपच्या जोरावर काहीतरी खास करून दाखवले आहे. आज सोशल मीडियावर अशाच एका तरुणाची चर्चा होत आहे; ज्याने मेकअप करून स्वतःचे चेहऱ्याचे रूपांतर कलाकारांच्या चेहऱ्यांमध्ये केले आहे. चला तर जाणून घेऊ या व्यक्तीबद्दल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला तो स्वतःचा चेहरा व्हिडीओत दाखवतो. त्यानंतर ज्या कलाकाराचा तो आज चेहऱ्यावर मेकअप करणार आहे त्याचा फोटो स्क्रीनवर दाखवतो आणि मेकअप करण्यास सुरुवात करतो. काही मेकअप प्रॉडक्ट्स (सौंदर्यप्रसाधने) वापरून, तो एखाद्या प्रसिद्ध कलाकाराच्या चेहऱ्याप्रमाणे स्वतःच्या चेहऱ्याची रचना करून घेतो. मेकअपचा उपयोग करून, त्याने स्वतःला जोकर, शाहरुख खान, प्रभास, कमल हासन, रजनीकांत, जॉनी सिन्स, करण जोहर आदी अनेक कलाकारांच्या चेहऱ्यांसारखा स्वतःच्या चेहऱ्याचा मेकओव्हर केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…“तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा…” विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी IAS अधिकाऱ्याने शेअर केली UPSC परीक्षेची गुणपत्रिका

व्हिडीओ नक्की बघा :

सृजित दामोदरन, असे या व्यक्तीचे नाव आहे. सृजित सध्या अमेरिकेत राहतो. तो व्यवसायाने शेफ असला तरीही त्याच्यात मेकअप करण्याचे अप्रतिम कौशल्य आहे. या कौशल्याच्या जोरावर तो कोणाचेही रूप मेकअपच्या साह्याने धारण करू शकतो. सृजित चेहऱ्यावर असा मेकअप लावतो की, क्षणात त्याचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीमध्ये बदलून जातो. मेकअप करून, तो स्वत:चे अनेक कलाकारांच्या चेहऱ्यामध्ये रूपांतर करून दाखवतो.

सोशल मीडियावर हे सगळे मेकअप ट्युटोरियलचे व्हिडीओ @chef_sreejith_damodaran या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. मेकअपनंतरचा सृजितचा चेहरा पाहून नेटकरी त्याचे खूप कौतुक करीत आहेत आणि त्याचे हे कौशल्य सर्वांत अनोखे आहे; असेदेखील म्हणताना दिसून आले आहेत आणि सोशल मीडियावर या तरुणाची चर्चा होताना दिसत आहे.

Story img Loader