Train Accident Viral Video: रेल्वे रूळ ओलांडताना घडलेला एक भयानक अपघात सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा आहे. ग्रेटर नोएडामधील असल्याचं सांगितलं जात असलेला हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हादरला आहे. एका तरुणानं रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला; पण क्षणात सगळं संपलं. काही सेकंदांत घडलेली ही दुर्घटना इतकी भीषण होती की, पाहणाऱ्यांनीही डोळे झाकून घेतले. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात…

रेल्वे ट्रॅकवर पडली बाईक, त्यानंतर जे घडलं ते अंगावर शहारे आणणारं!

व्हिडीओमध्ये दिसतं की, एक तरुण बाईकवरून रेल्वे ट्रॅक पार करीत होता. दोन्ही बाजूंनी पाहून तो पुढे सरकतो; पण अचानक त्याचं बाईकवर नियंत्रण राहत नाही आणि बाईक थेट रुळांवर कोसळते. तो तरुण घाईघाईने बाईक उचलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी लांबून एक ट्रेन वेगाने येताना दिसते. ट्रेनचा हॉर्न वाजताच तरुण प्राण वाचवण्यासाठी पळायला लागतो; पण त्याच क्षणी ट्रेन त्याला धडकते आणि क्षणात सगळं संपतं. पुढच्या क्षणी ट्रेन पुढे निघून जाते आणि मागे राहतं फक्त भीषण अपघाताचं भयावह असं दृश्य…

फाटक असतं, तर वाचला असता जीव?

या घटनेनंतर लोकांमध्ये संताप आणि प्रश्न दोन्ही वाढले आहेत. रेल्वे फाटक नसताना लोकांना ट्रॅक ओलांडण्याची मुभा कशी? व्हिडीओमध्ये कुठेही फाटक किंवा सुरक्षा रक्षक दिसत नाही. अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला आहे की, जर त्या ठिकाणी रेल्वे फाटक असतं, तर हा जीवघेणा अपघात टळू शकला असता, असे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

नेटकऱ्यांकडून संताप आणि शोक व्यक्त

ट्विटर (आता X)वरील @hai_mahmoodul नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. काहींनी लिहिलं, “जर थोडी सावधानी बाळगली असती, तर जीव वाचला असता.” तर काहींनी प्रतिक्रिया दिली, “अंगावर काटा आणणारा व्हिडीओ… उठायचीही संधी मिळाली नाही.”

तात्पर्य :

अशा दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी आणि नागरिकांनीही सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे. कारण- जीवन एकदाच मिळतं; पण एका चुकीमुळे ते हिरावलं जाऊ शकतं.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण एकच विचार करतोय, “थोडीशी घाई आणि एका चुकीमुळे गेला एक जीव…”