हेल्मेट घातले नाही तर दंड भरावा लागेल या भीतीने अनेकजण फक्त लांबून पोलीस उभे असलेले दिसले की लगेच हेल्मेट घालतात. इतरवेळी मात्र विना हेल्मेट बाईक किंवा स्कूटर चालवताना दिसतात. हेल्मेट सक्तीचा नियम हा आपल्याच सुरक्षेसाठी करण्यात आला आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे काहीजण नियम तोडून उलट पोलीस, ट्रॅफिक हवालदार यांच्याशी वाद घालत असलेले आपण पाहिले असेल. असाच काहीसा प्रकार बंगळूरमध्ये घडला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

फेलिक्स राज नावाच्या व्यक्तीला बंगळूर ट्रॅफिक पोलिसांकडून एक नोटिफिकेशन पाठवण्यात आले. स्कूटर चालवताना हेल्मेट न घातल्याने, ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकरण्यात आल्याचे हे नोटीफिकेशन होते. पण या व्यक्तीने हेल्मेट न घातल्याचा पोलिसांकडे काय पुरावा आहे, असा प्रश्न ट्विटरवर विचारला. त्यावर बंगळूर ट्रॅफिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा फोटो ट्विटरवर शेअर करत याचा पुरावा दिला. पाहा बंगळूर ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला फोटो.

आणखी वाचा : ‘देणाऱ्याने देत जावे..’ ब्लॉगरच्या मदतीने गरीब आजींनी सुरू केला नवा व्यवसाय; Viral Video पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

बंगळूर ट्रॅफिक पोलिसांचे ट्वीट :

पोलिसांकडे पुरावा मागणे आपल्यालाच महागात पडल्याचे या व्यक्तीच्या लक्षात येताच या व्यक्तीने आधीचे ट्विट डिलीट केले आणि ‘ प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे मलाही पुरावा मागण्याचा अधिकार आहे.पुरावा दिल्याबद्दल धन्यवाद मी दंड भरेन’ असा रिप्लाय पोलिसांना दिला आहे. यावर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहा.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : शेतातील टोमॅटो गाडीत भरण्याची ट्रिक पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकरी म्हणाले ‘ऑलिम्पिक स्पर्धेत..’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांच्या या भन्नाट प्रतिक्रिया पाहून आणि फेलिक्स राज या व्यक्तीला आलेला अनुभव वाचून यापुढे कोणीही पोलिसांकडे पुरावा मागणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.