scorecardresearch

Premium

Video: पठ्ठ्याचा जुगाडाला तोड नाही! सायकलसारखी पायंडल मारणारी चक्क बुलेटच बनवली, खरेदीसाठी लोकांच्या लागल्या रांगा

पायंडलवाली बुलेट बनवण्याचा देशी जुगाड केल्याच्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, एकदा पाहाच…

bullet converted into cycle viral video
सायकलसारखी बुलेट बनवल्याचा व्हिडीओ झाला व्हायरल. (image-Instagram)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा अंदाज लावणं कठीण आहे. कधी कोणी कारला हेलिकॉप्टर बनवतो तर कोणी विटांपासू कुलर बनवल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आताही अशाच प्रकारचा जुगाड केल्याचा भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. एका व्यक्तीने बुलेट सवारीचं स्वप्न साकार केल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. पट्रोलशिवाय चालणारी बुलेट बनवण्याचा जुगाड या पठ्ठ्यानं केला आहे. या बुलेटमध्ये काय खासीयत आहे, यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडीओ पाहावा लागेल.

या बुलेटचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल, कारण…

एक व्यक्ती बुलेट चालवताना व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. पण तुम्ही हा व्हिडीओ बारकाईने पाहिला तर तुम्हाला तो व्यक्ती पायंडल मारून बुलेट चालवताना व्हिडीओत दिसत आहे. लोक जशी सायकल चालवतात, तशाचप्रकारे या व्यक्तीने बुलेटलाही पायंडल लावण्याची शक्कल लढवली आहे. तुम्ही तीक्ष्ण नजरेने या व्हिडीओला पाहिला, तर तुम्हाला कळेल वरचा संपूर्ण भाग बुलेटसारखा आहे. पण खालच्या भागात लावलेले पार्ट्स सायकलचे आहेत. यावरुन स्पष्ट दिसतंय की या तरुणाने भन्नाट जुगाड करुन सायकल आणि बुलेटचे पार्ट मिक्स करुन बुलेट सायकल बनवली आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

नक्की वाचा – मासा बनला सुपरमॅन! समुद्रात धावणाऱ्या बोटीवरून थेट पलीकडे मारली उडी, video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

इथे पाहा व्हिडीओ

@prince_raj9927 या नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त गाजला आहे. कारण आतापर्यंत ९ लाखांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. सोशल मीडियावर काही ना काही जुगाड करुन वाहने बनवण्याचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले असतील. पण अशाप्रकारचा व्हिडीओ याआधी तुम्ही कदाचित पाहिला नसेल. कारण पेट्रोलचे वाढणारे दर पाहता लोकांच्या डोक्यात पैसे वाचवण्यासाठी भन्नाट कल्पना येतात. आणि एका व्यक्तीने सायकलसारखी बुलेट बनवण्याचा जुगाड केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-12-2022 at 11:04 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×