Desi Jugaad Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कुणी गाडीचे हेलिकॉप्टर बनवतो; तर कधी जुगाड करून विटांपासून कूलर बनवतो. आता असाच एक नव्या जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. यात ट्रकचा तुटलेला हेडलाइट दुरुस्त करण्यासाठी एका व्यक्तीने असे काही केले की, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ट्रकच्या हेडलाइटची काच तुटल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रकच्या हेडलाइटची काच आयताकृती असते हे तुम्ही कधी ना कधी पाहिलेच असेल; जी ठीक करण्यासाठी त्या व्यक्तीने मिठाईचा प्लास्टिकचा बॉक्स वापरला आहे. हा प्लास्टिकचा पारदर्शक बॉक्स त्या व्यक्तीने तुटलेल्या काचेच्या जागी बसवला. तुम्ही पाहू शकता की, हेडलाइटच्या जागी हा बॉक्स अगदी व्यवस्थित बसला आहे. दुरून पाहिल्यावर तुम्हाला ती काच आहे की प्लास्टिकचा बॉक्स आहे हे ओळखणे अवघड होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हा अप्रतिम जुगाड @harmanbatth या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एलआयडी पुन्हा वापरला केला जाऊ शकतो. अनेकांना या व्यक्तीची ही आयडिया फार आवडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.