Viral Video: आपल्यातील अनेक जणांना प्रवास करायला भरपूर आवडते. नवनवीन ठिकाणे, शहर, देश फिरणे आणि तेथील ऐतिहासिक वा पर्यटनस्थळांना भेट देणे काही जणांचा छंद तर काही जणांची बकेट लिस्टमधील जणू काही इच्छाच असते. याआधीसुद्धा रिक्षा, स्केटिंगद्वारे विविध देशांत प्रवास करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण, आज एक तरुण स्कुटी घेऊन भारतातून ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सज्ज झाला आह. चला तर या लेखातून त्याच्या प्रवासाबद्दल खास गोष्टी जाणून घेऊयात.

केरळमधील इर्शाद या रहिवाशाने हा खास प्रवास सुरू केला आहे. तरुण स्कुटीवरून भारतातून ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. त्याच्या या प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुण विविध देश पार करण्यासाठी सज्ज झाला आहे. यादरम्यान प्रवासाविषयी विविध माहिती शेअर करताना विविध देशांतील छायाचित्रे आणि व्हिडीओ अकाउंटवर पोस्ट करीत आहे. तुम्हीसुद्धा पाहा हा व्हिडीओ.

हेही वाचा…VIDEO: नातीचा फोटो काढण्याचा हट्ट आजोबांनी केला ‘असा’ पूर्ण; पोझसाठी मार्गदर्शन अन् प्रेम पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

दोन्ही मित्रांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत नमूद केलं आहे की, या प्रवासादरम्यान सुमारे ४० हजार किलोमीटर अंतर कापणार आहे, ज्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे. या प्रवासादरम्यान भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार, लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशियासह १३ देशांमधून ते जाणार आहेत; तर इंडोनेशियाच्या किनाऱ्यावरून जहाजाने प्रवास करून ऑस्ट्रेलिया देशात पोहोचणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवासादरम्यान काही वेळ विश्रांती घेऊन तरुण त्यांच्या प्रवासात मोलाचा वाटा असणाऱ्या स्कुटीची झलक दाखवत आहेत. कारण स्कुटीवर त्यांनी इंडिया ते ऑस्ट्रेलिया असा मजकूर लिहिलेले पोस्टरसुद्धा चिटकवून घेतले आहे. तसेच पूर्ण एक वर्षात ते कोणत्या देशातून प्रवास करणार आहेत यांची नावे नमूद केलेला नकाशासुद्धा बरोबर ठेवला आहे. प्रवासादरम्यान लागणाऱ्या काही वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठी एक बॉक्स स्कुटीला जोडून घेतला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @village_vibes_irshad’s आणि @village_vibes_irshadandkhaja_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.