Man holding snake in Sabarmati Express : भारतातील रेल्वे प्रवासात अनेकदा अनपेक्षित आणि विचित्र घटना घडत असतात, कधी कोणी स्टंटबाजी करताना दिसते तर कधी कोणी डान्स करताना दिसते. कधी कोणी भांडताना दिसते तर कधी कोणी स्वत:चा जीव धोक्यात घालताना दिसतात. अनेकदा रेल्वेमध्ये विक्रत्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. अनेकदा हटके स्टाईलमध्ये विक्री करणारे विक्रेते चर्चेत येतात. तर अनेकदा ग्राहकांची फसवणूक करणारे विक्रेते चर्चेत येतात.
व्हिडिओमध्ये माणूस कोचमध्ये चालत आहे, त्याच्या हातात जीवंत आणि खराखुरा साप आहे. हातात साप धरून तो माणूस प्रवाशांकडून पैसे मागत आहे. काही प्रवासी पाहून थोडे पैसे देताना दिसत आहेत, तर इतर फक्त पाहत आहेत. रघुवंशी यांनी पोस्टमध्ये लिहिले, “मंगोलाई (मध्य प्रदेश) येथे साप घेऊन माणूस गेला. भारतीय रेल्वेत मेहनती श्रमिक वर्गाकडून पैसे मागण्याचा नवा मार्ग.”
रेल्वेत साप घेऊन फिरणाऱ्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
नुकतेच साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेले एक असाच प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, जिथे एका माणसाने साप हातात धरून प्रवाशांकडून पैसे मागताना दिसत आहे. या २२ सेकंदांच्या व्हिडिओने लोकांना धक्का दिला असून, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ मंगोलाई ते बीना जंक्शन (मध्य प्रदेश) दरम्यानचा असून X वर डीपक रघुवंशी यांनी शेअर केला आहे.
प्रवाशांचा जीवाला धोका
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. रेल्वे सारख्या सार्वजनिक वाहतूकीचा वापर लाखो प्रवासी करतात तिथे एखादा माणू साप घेऊन शिरतोच कसा? एवढंच नाही तर तो साप हातात धरून लोकांना पैसे मागत आहे हे दृश्य अत्यंत धक्कादायक होते. लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे हे कृत्य पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओने रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थितीत केला आहे.
रेल्वे प्रशासनाने देखील या घटनेकडे लक्ष दिले असून, रेल्वे सेवा (Railway Seva) आणि रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) प्रवाशांकडून PNR किंवा UTS नंबर आणि मोबाईल नंबर मागितले आहेत, जेणेकरून योग्य ती कारवाई करता येईल.
सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी माणसाला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सखोल चौकशी करत आहे.