मेक्सिकोमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने उत्साहाच्याभरात बैलांची लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी वापरण्यात येणारे औषध खालल्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे औषध खालल्यामुळे तीन दिवस या व्यक्तीला त्रास होत होता. अखेर त्याला रुग्णालायमध्ये दाखल करण्यात आले आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीवर अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेजवळ असलेल्या रेनोसा शहरामधील हॉस्पीटल २७० मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘ला रिपब्लिका’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार एका महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी या व्यक्तीने औषध घेतलं होतं. “या व्यक्तीने लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषधाचे अती सेवन केल्याने त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मेक्सिकोमध्ये शेतकरी बैलांची लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी वापरण्यात येणारे औषध या व्यक्तीने खाल्ले होते,” अशी माहिती डॉक्टरांनी वृत्तपत्राला दिली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती व्हेराक्रूझ शहरामध्ये हे औषध विकत घेण्यासाठी आली होती. मात्र या औषधामुळे भलताच परिणाम झाला आणि या व्यक्तीला वेदना होऊ लागल्या. मात्र तीन दिवसांनंतर या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. मात्र या शस्त्रक्रीयेनंतर या व्यक्तीची प्रकृती कशी आहे याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.