भारतासह जगभरात जुगाड टेक्नॉलॉजीची मागणी सातत्याने वाढतेय. लोक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नातून अनेकांच्या हातून एकाहून एक मजेशीर गोष्टी तयार होत आहेत. कधी कोण फेकून दिलेल्या टायर्सपासून बसायच्या सीट्स बनवतायत, तर कधी कोणी बाइकवर वेगळे प्रयोग करून नवीन काही तरी तयार करतात. असे देसी जुगाड अनेकांची मनं जिंकत आहेत. काही वेळा देशातील बड्या उद्योगपतींनाही देसी जुगाडाचे व्हिडीओ पसंतीस पडतात, त्यामुळे ते आपल्या सोशल मीडियावर देसी जुगाडचे व्हिडीओ शेअर करीत असतात. यात आता पुन्हा एका देसी जुगाडचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुण आपल्या बाइकला अशा प्रकारे मॉडीफाय करतो, ज्याचा कधी कोणी विचारही केला नसेल. या व्हिडीओतील तरुणाने देसी जुगाड वापरून जगातील सर्वात अनोखी बाइक बनवली आहे, जी आता चर्चेचा विषय ठरत आहे.

पैसा आणि आवश्यक गोष्टींच्या कमतरतेमुळे लोक असे देसी जुगाड वापरून वेगवेगळ्या गोष्टी तयार करतात, ज्या दिसायलाही एकदम जबरदस्त आणि हटके असतात. आता ही बाइकच बघा ना, एका व्यक्तीने जुगाड वापरून एकदम जबरदस्त बनवली आहे. ही अनोखी बाइक लोखंड, बाइक हॅण्डल, चेन आणि सीट वापरून बनवली आहे. जी एकदम हटके दिसतेय. विशेष म्हणजे या बाइकला दोन रबरी टायरऐवजी दोन मोठे लोखंडी गोलाकार चाकं एकात एक बसवल्याचे दिसतेय. तसेच बसण्यासाठी एक सीट फिट केली आहे, त्या सीटवर बसून व्यक्ती ही जरा हटके बाइक चालवत आहे, ही बाइक पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या बाइकचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे.

पगार २ कोटी, राहण्या-खाण्याची फ्री सोय; तरीही ‘या’ देशातील लोक ही नोकरी करण्यास तयार नाहीत; असे का? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा जुगाड बघून तुम्हीदेखील क्षणभर विचारात पडले असाल की, ही बाइक व्यक्तीने बनवली तरी कशी?. हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘berandabogor’ नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत लाखो युजर्सनी पाहिला आहे, तर ६८ हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केला आहे. हा व्हिडीओ पाहून काहींना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. तर अनेक युजर्स कौतुक करीत आहेत. या देसी जुगाडला २१ तोफांची सलामी द्यावी, असे काहींचे म्हणणे आहे. पण तुम्हाला हा जुगाड कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा.