Viral Video: घर हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. घर आकर्षक, स्वछ, नीटनेटकं दिसावे याकडे सर्वांचाच कल असतो. मॉडर्न स्वयंपाकघराचा जन्मसुद्धा अशाच गृहसजावटीच्या आणि उपयुक्ततेच्या गरजेतून किंवा बदलत्या जीवनशैलीची गरजेतून निर्माण झाला आहे. स्वयंपाकघरात काम करताना वेळेची बचत आणि स्वच्छता या दोन सर्वात गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पण, काही जण इलेक्ट्रिक गोष्टी वगळून जुगाड पर्यायाला प्राधान्य देतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये पोत्यातून वा गोणीतून तांदूळ काढण्यासाठी एका तरुणाने जबरदस्त उपाय शोधून काढला आहे.

आपल्यातील अनेक जण प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग झाडे ठेवण्यापासून ते अंड्यातील पिवळ बलक वेगळ करण्यासाठी पर्यंत अनेक गोष्टींसाठी करतात. पण, तुम्ही कधी तांदूळ काढण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा उपयोग केलेला पहिला आहे का? नाही… तर आज व्हायरल व्हिडीओत तसंच काहीस पाहायला मिळालं आहे. तरुणाने स्वयंपाक घराच्या ओट्यावर तांदळाने भरलेली प्लास्टिकची गोणी ठेवली आहे. तसेच या प्लास्टिकच्या गोणीला एक छोटसं छिद्र पडून त्यात एक प्लास्टिकची बाटली बसवून घेतली आहे. एकदा पाहाच तरुणाचा हा जुगाड.

हेही वाचा…मुलाखतीत डोकावणारा तुमचा छंद… तरुणीने सादर केलं ऑफिसमध्ये नृत्य; पाहा ‘हा’ व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, तरुणाने प्लास्टिकच्या गोणीमध्ये अशाप्रकारे बाटली बसवून घेतली आहे की, बाटलीचे झाकण उघडताच त्यातून तांदुळ बाहेर पडतो. तरुणाने बाटली उघडायच्या आधी स्टीलच्या टोप हातात धरला आहे आणि बाटलीचे झाकण उघडताच टोपात तांदूळ पडताना दिसत आहेत. जेवढे हवे तेवढे तांदूळ टोपात घेतल्यानंतर तरुण पुन्हा बाटलीचे झाकण लावून ठेवतो ; जे पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि टाळ्या वाजवून नक्कीच त्याचे कौतुक कराल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्केटमधून तांदळाची गोणी किंवा पोती आणल्यावर ती आपण स्वयंपाक घरात ठेवून देतो. पण, कधी कधी आपल्याकडून गोणी फाटते किंवा पोत्यातून घेताना अनेकदा जमिनीवर तांदूळ पडतात. तर आज सोशल मीडियावर यावर जबरदस्त जुगाड दाखवण्यात आला आहे. हा व्हिडीओ @maximum_manthan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म @swiggy_instamart ने देखील प्रतिक्रिया दिली आणि ‘तुम्ही रोज बदाम खाता असे दिसते आहे’ ; अशी कमेंट केली आहे. तसेच काही जण या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया तर तरुणाच्या युक्तीचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.