रिक्षाचालकांची मनमानी कुणापासून लपून राहिलेली नाही. महागडे भाडे आणि ऑटो चालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांना रोज त्रासाचा सामना करावा लागतो. यात रिक्षाचे मीटर मुंबईच्या लोकल ट्रेनपेक्षा जास्त वेगाने धावतात. असाच एक प्रकार बेंगळुरूमधून समोर आला आहे. जिथे एका सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओने रिक्षातून प्रवास करताना एक वेगळाच अनुभव आला आहे, जो त्यांनी ट्विटरवर शेअर केला.

सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओने शेअर केला अनुभव

न्यूरल गॅरेज नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ मंदार नाटेकर यांनी बेंगळुरुमध्ये ऑटो रिक्षाने फिरतानाचा त्यांचा अनुभव शेअर केला. यात त्यांनी ऑफिसला जाण्यासाठी ऑटो रिक्षा पकडली. ते राहत असलेल्या ठिकाणाहून त्यांचे कार्यालय अवघ्या ५०० मीटर अंतरावर होते. यावेळी ऑटो चालकाने सांगितलेले भाडे ऐकून तेही आश्चर्यचकित झाले. पाचशे मीटरच्या राईडसाठी चालकाने शंभर रुपये भाडे आकारले होते.

यावर मंदार नाटेकर यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, हे मीटर इतके महाग मीटर आहे की जे कधीही वापरले जात नाही. बंगळुरूची मुंबईशी तुलना करताना त्यांनी लिहिले की, मुंबईत ९ किमी प्रवासाचे भाडे १०० रुपये आहे. मंदार नाटेकर यांची ही पोस्ट आता तुफान व्हायरल होत आहे.

ज्यावर युजर्स विविध कमेंट करत आहे. काही लोक त्यांचे अनुभव सांगत आहेत तर काही ऑटोचालकांच्या मनमानीमुळे सतत त्रस्त असल्याचे म्हणत यासोबतच सरकारने आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर टीवीएफचे अध्यक्ष विजय कोशीने कमेंट करत लिहिले की, मुंबईबाहेरील अनेक शहरांमध्ये हे व्यावहारिक रुपाने समान आहे. चेन्नईतील ऑटो राइड बदनामीसाठी प्रसिद्ध आहे. ही पोस्ट व्हायरल होताच आता वेगवेगळ्या शहरांमधील ऑटो रिक्षाच्या भाड्यासंदर्भात चर्चा सुरू झाली. यावर लोकांनी त्यांचे मत जाहीर केले, एका व्यक्तीने म्हटले की, इतर शहरांतील लोकांसाठी भाडे जास्त असू शकते.