Monkey Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ अनेकदा आपल्याला काही ना काही शिकवून जातात. असे व्हिडीओ अनेकदा काळजात घर करून जातात. यातले अनेक व्हिडीओ प्राण्यांचे असतात. माणसांचं आणि प्राण्यांचं नात हे खूप जवळचं असतं असं म्हणतात. न बोलताच प्राणी आपल्या भावना कृतीतून व्यक्त करून दाखवतात.

आजकाल तर माणसांपेक्षा प्राणीच इमानदार असंही म्हटलं जातं. जर प्राण्यांना जीव लावला तर तेदेखील आपल्याला तितकाच जीव लावतात. प्राण्यांशी जो कोणी आपुलकीने प्रेमाने वागतो प्राणीही त्याला तितकंच प्रेम देतात. सध्या याच नात्यातील प्रेम दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक माणूस जेवत असताना अचानक माकड येतं आणि त्याच्या ताटातलं जेवण जेऊ लागतं. पुढे नेमकं काय घडतं, ते जाणून घेऊ या…

हेही वाचा… ‘तांबडी चांबडी’ गाण्यावर डान्स करताना रस्त्यावर झोपला अन्…, परदेशातील ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी माणसाचं खूप कौतुक केलं आहे. या व्हिडीओत एक माणूस पंगतीत जेवायला बसला आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो की एका ठिकाणी पंगतीत अनेक लोक जेवायला बसले आहेत. तिथेच एक माणूस जेवत असताना अचानक त्याच्या ताटातली खीर खायला एक माकड येतो आणि तो माणूसही त्याला ती खीर खाऊ देतो. तेवढ्यात दुसरा माणूस तिथे येऊन माकडाला हकलवण्याचा प्रयत्न करतो पण ज्या व्यक्तीच्या ताटात माकड खीर खात असतो ती व्यक्ती त्याला म्हणते की राहुदे त्याला खीर खाऊदे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @pinkvillalifestyle या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “माकड माणसाच्या ताटातून खीर चोरत आहे” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… ही कसली दादागिरी! कारचालकाने डिलिव्हरी बॉयचं पार्सल रस्त्यावर फेकलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो चोरी करत नाही आहे, तो माणूस त्याच्यासोबत शेअर करत आहे” तर दुसऱ्याने “काकांना सलाम” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “काकांचा दयाळूपणा” अशी कमेंट केली.