सापाचे नाव काढले तरी अनेकांना घाम फुटतो. विषारी सापाचा दंशाने माणूस जागच्या जागी मरु शकतो. त्यामुळे अनेकजण सापापासून दोन हात लांबच राहतात. मात्र काहीजण सापांना सहज उचलून त्यांच्यासोबत खेळताना दिसतात, कधी हे विषारी साप उचलून गळ्यात लटकवत फिरतात. गेल्या शुक्रवारी नागपंचमीच्या मूहूर्तावर बिहारमधील विविध ठिकाणांहून असे व्हिडीओ समोर आले होते. जे पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यातीलच एक व्हिडीओ आता मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती गळ्यात दहाहून अधिक भले- मोठे साप घेऊन फिरताना दिसत आहे. यात म्हातारी माणसं, लहान मुले सगळेच अगदी सहज सापाला हात घेऊन फिरताना दिसत आहेत.
तरुणाने गळ्यात लटकवले विषारी साप
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती गळ्यात १० हून अधिक लहान मोठे घेऊन उभा आहे. हा व्हिडीओ खूपच भीतीदायक आहे. गळ्यात अगदी सहज अनेक भले-मोठे विषारी साप एकावर एक असे करुन गळ्यात लटकवले आहेत. इतकच नाही तर जेव्हा त्याच्या गळ्यातील साप वळवळत खाली पडतात तेव्हा तिथे उभ्या असलेल्या व्यक्ती एक एक करुन ते साप उचलून पुन्हा त्याच्या गळ्यात लटकवत आहेत. या व्हिडीओमधील व्यक्तीच्या तोंडावर अजिबात कसलीही भीती दिसून येत नाही. पण असे करणे अत्यंत धोकादायक ठरु शकते.
दरवर्षी नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी येते, जी देशभरातील अनेक राज्यांमध्ये साजरी केली जाते. या दिवशी लोक नाग देवतेची पूजा करतात. तसेचलोक विषारी सापांसोबत स्टंटबाजी करतात. सहसा असे व्हिडिओ पाहायला मिळत नाहीत. अनेकदा तज्ञांचे सापासोबत स्टंटबाजी करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र या व्हिडीओमध्ये काही भक्त उत्साहाने सापाला उचलून स्टंटबाजी करताना दिसत आहेत. मात्र असे करणे माणसांबरोबरच सापांसाठीही धोकादायक आहे.
