रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे शूज, चप्पल तर ओले होतातच पण काहीवेळा कपडेही खराब होण्याची भीती असते. भरधाव वेगात येणारी वाहनही अनेकदा पादचाऱ्यांच्या अंगावर रस्त्यावर साचलेले पाणी उडवत जातात. अशावेळी माखलेले शरीर, ओले कपडे, शूज घालून शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्याची इच्छ नसते. अशा परिस्थितीत लोकांची अडचण समजून घेत एका तरुणीने कमाईची नवी संधी शोधून काढली आहे. हा तरुण करत असलेले काम पाहून तुम्हालाही वाटेल की, जगात पैसा आहे फक्त तो आपल्याला डोकं लावून कमवता आला पाहिजे. या तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

पावसाळ्यात केवळ भारतातच नाही तर परदेशातही रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी साचते. भारतात ही तर अधिक सामान्य गोष्ट आहे, पण अशावेळी पाण्याने भरलेला रस्ता ओलांडताना नागरिकांना अनेक अडचणी येतात. नागरिकांची हिच समस्या पाहून तरुणाने असा एक उपाय शोधून काढला, ज्यातून त्याने चक्क कमाईला सुरुवात केली.

पंख्याच्या मोटरचा वापर करत बनवला फिरता CCTV कॅमेरा; व्यक्तीचा देसी जुगाड पाहून युजर्स म्हणाले, हे भारताबाहेर जाता…

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर वेगाने पाणी वाहत आहे. या पाण्याने भरलेला रस्ता ओलांडला तर चप्पल आणि पॅन्ट ओली होण्याची काही लोकांना काळजी वाटतेय. अशा लोकांना न भिजता रस्ता ओलांडण्यास मदत करण्यासाठी तरुणाने जुगाड तयार केला आहे. यासाठी तरुणाने एक बेंच बनवला आहे ज्याच्या चारही तळाशी चाकं आहेत. हा तरुण लोकांना या बाकावर उभं राहण्यास सांगतो, त्यानंतर बेंच ढकलत रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा तरुण या जुगाड बेंचचाा वापर करणाऱ्या लोकांकडून पैसेही घेतो. शूज आणि पॅंट न भिजवता रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला पोहचवल्याबद्दल लोक त्याला पैसेही देत ​​आहेत. अशाप्रकारचे मेहनत करत हा तरुण पैसे कमावत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी म्हटले की, जर तुम्हाला चांगला बिझनेसमन बनायचे असेल तर समस्या शोधा आणि मग त्यावर उपाय तयार करा यातून कमाई आपोआप होईल.