Tiger attacked man viral video: सोशल मीडियावर वन्य प्राण्यांच्या प्राणघातक हल्ल्यांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. जंगलात भटकणाऱ्या एका वाघाने वाऱ्याच्या वेगानं धाव घेत हत्तीवर बसलेल्या माहुतावर पंजा मारल्याचा व्हिडीओ नुकताच इंटरनेटवर व्हायरल झाला होता. आताही वाघाने पिंजऱ्यात असलेल्या एका ट्रेनरवर जीवघेणा हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पिंजऱ्यात दोन वाघांसोबत एक ट्रेनर हातवारे करून खेळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पिसाळलेल्या एका वाघाने त्या ट्रेनरची थेट मानगुटीच धरली आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इटलीच्या एका सर्कस शो मधील असल्याची माहिती आहे.

ट्रेनरने मांजरींना वाघाच्या जवळ सोडले अन् घडलं भयंकर

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक ट्रेनर दोन वाघांसोबत पिंजऱ्यात लोकांच्या मनोरंजनासाठी खेळ करताना दिसत आहे. वाघाला इशारे करून खेळवण्याचा प्रयत्न करताना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या वाघाने ट्रेनवर थेट झेप घेतली आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. वाघांसोबत खेळत असताना ट्रेनरने काही मांजरींना पिंजऱ्यात आणल्यामुळं वाघाने हा हल्ला केला, असा अंदाज सर्कस पाहणाऱ्या लोकांनी वर्तवला आहे. वाघाच्या जवळच एका मांजरीला ट्रेनरने सोडल्याने तो पिसाळला आणि त्यानंतर वाघाने थेट ट्रेनवर हल्ला केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. वाघाने आधी ट्रेनरच्या जवळ एक फेरी मारली, पण त्यानंतर वाघाने ट्रेनरचे पाय पकडून फरफटत नेलं.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

नक्की वाचा – बापरे! खेळण्यासाठी घरातच आणला विशाल अजगराला, काही सेकंदातच अजगराने खेळ खल्लास केला, पाहा थरारक Video

इथे पाहा व्हिडीओ

वाघाने हल्ला केल्यानंतर सर्कस पाहणारे लोक पिंजऱ्यात घुसली आणि ट्रेनरची सुटका केली. वाघाच्या हल्ल्यात ट्रेनर गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या धक्कादायक घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, वाघाच्या हल्ल्याचे धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. वाघासारख्या हिंसक प्राण्यासोबत मस्ती करण्याचा वेेडेपणा काही जण करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. वाघापासून जितकं दूर राहता येईल तितकं राहावं, ज्या परिसरात वाघ राहतो किंवा त्याचा वावर असतो, अशा ठिकाणी लोकांना जाऊ नये, अशा सूचनाही वनविभागाकडून नेहमी देण्यात येतात.