दुचाकी चालवणाऱ्यांना हेल्मेट घालण्याच्या सूचना नेहमीच दिल्या जातात. परंतु, काही लोक नियमांचे उल्लंघन करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. तर काहीजण दंड बसू नये म्हणून घालतात. अशावेळी ट्राफिक पोलीस दिसताच ते हेल्मेट घालतात तर पुढे जाऊन पुन्हा काढून ठेवतात. पण कधी जर ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीत सापडला तर मात्र दंड हा भरावाच लागतो. असं अनेकांसोबत होतं. हल्ली एका फोटोवर तुमच्या गाडीवर फाईन बसतो. दरम्यान एका पठ्ठ्यानं पोलीस दिसताच अवघ्या दोन सेकंदात हेल्मेट तयार करुन घातलं देखील आहे. तरुणाचा हा हटके जुगाड पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल..

या तरुणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लिसांना चकवा देण्यासाठी एका तरुणानं काय जुगाड केलाय हे आता तुम्हीच पाहा. दंड वाचवण्यासाठी त्यानं हेल्मेटच्या नावाखाली जे काय घातलंय ते पाहून खरंच पोलिसांना सुद्धा चक्कर येईल.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बाईकवर दोघेजण बसले आहेत. यावेळी मागे बसलेल्या तरुणानं चक्क एक कागदी पिशवी डोक्यात घातली आहे. त्यामुळे लांबून कुणीही पाहिलं तरी ते हेल्मेटच आहे असं वाटतंय.

पाहा तरुणाचा हटके जुगाड

हेही वाचा >> पारंपरिक ते अधिक सुंदर! कोकणातील अनोखा आकाश कंदील; इको फ्रेंडली कंदीलाचे PHOTO पाहून म्हणाल वाहह..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा फोटो @3rdEyeDude या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. फोटोला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. एका यूझरनं लिहिलं, की ‘लगता है हेलमेट की गुणवत्ता का प्रचार कर रहे हैं..