सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्याची नशा आताच्या तरुण पिढीत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रोज काही ना काही भन्नाट कृत्य करून लोकांचं मनोरंजन करण्यात आजकालच्या तरुणांना चांगलाच रस आहे. ज्यांना जबरदस्त डान्स करण्याची कला अवगत आहे, अशी माणसं तर भन्नाट स्टेप्स करून लोकांचं मनोरंजन करतच असतात. पण आता लग्नसोहळ्यातील नवरा-नवरीनेही यात उडी घेतली आहे. भर लग्नमंडपात थेट पाहुण्यांच्या समोर मनोरंज करण्यासाठी काहीतरी भन्नाट करायचं त्यांनी ठरवलेलं असतं. असाच काहिसा प्रकार एका जोडप्याने स्टेजवर केला आहे. हे जोडपं पाहुण्यांच्या समोर असं काही करेल, असं कुणालाच वाटलं नसेल. पण लोकांचा विचार न करता त्यांनी जे काही केलं, ते व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहून नेटकरीही चक्रवले आहेत.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. नवरीला भर मंडपात हुक्का पिण्याचा मोह आवरला नाही. नवरी हुक्का पित असल्याचं पाहताच नवऱ्यानेही जबरदस्त प्रतिसाद दिला. नवरी स्टेजवर असतानाच नवऱ्याने तिला किस केला. हे सर्व पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला धक्काच बसला. लग्नसराईचा मोसम सुरु झाला असून अनेक जोडपी लग्नसोहळ्यात आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन देतात. पण व्हायरल झालेल्या व्हिडीओत जे कपल दिसत आहे, त्यांनी भन्नाट काहीतरी करण्याचं ठरवलेलं दिसतंय.

young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
nagpur md drug selling fight broke out between two gangs
नागपूर: पोटात गोळी शिरल्यावरही युवकाने पिस्तुल हिसकावली
Clean stained sheets without a washing machine
वॉशिंग मशिनशिवाय मळलेल्या चादरी कशा कराव्या साफ, जाणून घ्या सोप्या टिप्स
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

इथे पाहा व्हिडीओ

नवरा-नवरीला चढली हुक्क्याची झिंग

वसीम आणि वेडिंग वर्ड पेज नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत स्टेजवर सुंदर पेहरावात उभी असलेली नवरा-नवरी चक्क हुक्का ओढताना दिसत आहे. नवरीला हुक्का पिताना पाहून नवऱ्यानेही कमालच केली. स्टेजवरच नवऱ्याने नवरीला किस केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून आतापर्यंत जवळपास ८१ हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर दोन हजारांहून अधिक जणांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.