Maruti Suzuki Victoris Price Reveal: मारुती सुझुकी कंपनीने बुधवारी त्यांची नवीन एसयूव्ही सादर केली आहे. ही गाडी Arena शोरूममध्ये उपलब्ध होईल. कंपनीच्या नव्या एसयूव्हीचे नाव “मारुती सुझुकी व्हिक्टोरिस” (Maruti Suzuki Victoris) असणार आहे. ही गाडी Brezza पेक्षा वरच्या श्रेणीतील असेल, म्हणजेच आता Arena शोरूममधली सर्वात मोठी व महागडी (फ्लॅगशिप) SUV “मारुती सुझुकी व्हिक्टोरिस” हीच असेल. त्यामुळे ब्रँडने आधीच ११ हजार रुपयांच्या टोकन रकमेवर बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
टेक-पॅक्ड केबिन
मारुती सुझुकी व्हिक्टोरिच्या केबिनमध्ये सेगमेंट-फर्स्ट फीचर्स आहेत, जे भारतातील हायपर-कनेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित तरुणांना आकर्षित करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. ॲप स्टोअरसह २५.६५ सेमी स्मार्टप्ले प्रो एक्स इन्फोटेनमेंट सिस्टम, ३५+ व्हॉइस कमांडसह अलेक्सा ऑटो एआय आणि ओटीए अपडेट्समुळे कार तिच्या ग्राहकांसाठी सज्ज आहे.
मारुती सुझुकीने हरमनबरोबर भागीदारी करून डॉल्बी अॅटमॉस ५.१ सराउंड साउंडसह प्रीमियम ८-स्पीकर इन्फिनिटी साउंड सिस्टम, ६४-रंगी ॲम्बियंट लाइटिंग सिस्टम, पूर्णपणे डिजिटल १०.२५-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस ॲपल कारप्ले / अँड्रॉइड ऑटो (म्हणजे मोबाईल गाडीच्या स्क्रीनशी वायर न लावता जोडता येईल). तसेच यात नव्या पिढीचं Suzuki Connect दिलं आहे, ज्यात ६० पेक्षा जास्त फीचर्स मिळतील (उदाहरणार्थ गाडीची माहिती, ट्रॅकिंग, सुरक्षा फीचर्स इत्यादी)…
आराम आणि सुविधा
तंत्रज्ञानाच्या पलीकडे मारुती सुझुकीने आधुनिक जीवनशैलीशी जुळणाऱ्या सुविधासुद्धा दिल्या आहेत, ज्यामध्ये स्मार्ट टेलगेट देण्यात आले आहेत. म्हणजे हाताने किंवा पायाने हलका इशारा केला तरी डिक्की आपोआप उघडेल किंवा बंद होईल. बटण किंवा विजेच्या मदतीने ड्रायव्हर सीट ८ वेगवेगळ्या प्रकारे हलवता येते. व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि वायरलेस चार्जिंगसह अनेक फास्ट -चार्जिंग पोर्ट, फर्स्ट अंडरबॉडी सीएनजी टँक म्हणजेच पहिल्यांदा सीएनजी टाकी गाडीच्या खाली बसवली आहे.
सुरक्षा फीचर्स
व्हिक्टोरिसमध्ये लेव्हल 2 ADAS आहे, ज्यामध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंगचा समावेश आहे. सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग्ज दिले आहेत, ज्यांना ११ व्ह्युजसह ३६० डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आदी फीचर्स असणार आहेत.

प्रत्येक जीवनशैलीसाठी पर्याय
- स्मार्ट हायब्रीड व्हेरिएंट १.५ लिटर पेट्रोलसह २१.१८ किमी मायलेज देते.
- ऑटोमॅटिक व्हेरिएंट – २१.०६ किमी जास्त मायलेज देते.
- ऑटोमॅटिक एडब्ल्यूडी व्हेरिएंट १९.०७ किमी मायलेज देते.
- स्ट्राँग हायब्रीड व्हेरिएंट १.५ लिटर पेट्रोलसह साधारण २८.६५ किमी \मायलेज देते आणि यात ईव्ही मोडसह, ई-सीव्हीटी असे पर्याय दिले आहेत.
- सीएनजी व्हेरिएंट २७.०२ मायलेज देते. या आकडेवारीमुळे मारुती व्हिक्टोरिस ही देशातील सर्वाधिक मायलेज देणारी एसयूव्ही बनली आहे.
रंग
मारुती सुझुकी व्हिक्टोरिस वीन मिस्टिक ग्रीन आणि इटरनल ब्लूसह १० रंगांमध्ये उपलब्ध आहे आणि व्हिक्टोरिस मोनोटोन आणि ड्युअल-टोन असे दोन पर्याय दिले आहेत.