‘नावात काय आहे?’ असं आपण म्हणतो, पण हेच नाव आपल्याला वेगळी ओळख देतं. पण, तुम्हाला माहितीये मेघालयात असं एक गाव आहे जिथे कोणालाही नाव नाही. आता नावच नाही म्हटल्यावर लोक ऐकमेकांना हाक कशी मारत असतील असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग जगाच्या पाठीवर असणाऱ्या अशा एका गावाबद्दल जाणून घेऊयात जिथे लोक एकमेकांना नावानं नाही तर विशिष्ट धून गाऊन हाक मारतात.

मेघालयाच्या निसर्गरम्य कुशीत काँगथांग हे गाव वसलं आहे. या गावात जन्मलेल्या प्रत्येक माणसाची विशिष्ट अशी धून आहे. ही धून म्हणजेच त्याचं नाव होय. त्यामुळे जर संवाद साधायचा असेल तर या विशिष्ट धूननं त्या माणसाला बोलावलं जातं. एएनआयच्या माहितीनुसार मुलं जन्मला आल्यानंतर त्याची आई विशिष्ट नावाची धून तयार करते. आणि ही धून पुढे त्या मुलाची ओळख होते. मुलाला नावानं हाक मारण्यापेक्षा या धूननंच हाक मारण्याची पद्धत इथे आहे.

आजूबाजूच्या गावातील लोक ही जूनी परंपरा अजूनही जपत आहे. विशेष म्हणजे काही मुलांच्या धून या बॉलिवूड गाण्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.