महाराष्ट्रातील सर्व दुकाने. आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी (१२ जानेवारी २०२२ रोजी) झालेल्या बैठकीत घेतला. या निर्णयानंतर अनेकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेल्या आंदोलनाची आठवण झालीय. मराठी पाट्यांसाठी दहा वर्षांपूर्वी मनसेने आंदोलन केले होते. मनसेच्या इशाऱ्यानंतर सर्वत्र मराठी पाट्या झाल्या होत्या.
ही संख्या वाढल्यानंतर अलीकडे पुन्हा मराठीला डावलून फक्त इंग्रजीमध्ये पाट्या लावण्याचे प्रकार वाढले होते. मात्र महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारच्या नवीन नियमांमुळे पुन्हा मराठी पाट्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. मात्र ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला असला तरी कालपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी सर्वात आधी जाहीर सभेमध्ये मराठी पाट्यांचा मुद्दा मांडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जळगावमधील सभेमध्ये राज ठाकरेंनी मराठी पाट्यांचा मुद्दा उपस्थित करत मराठी पाट्यांची मागणी करणं काही चुकीचं नसल्याचं म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण: मराठी पाट्यांना व्यापारी संघटनांचा विरोध का?
“महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनांच्या बाहेर, दुकानांच्या बाहेर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत. ही काय चुकीची गोष्ट आहे का? जा गुजरातमध्ये, जा तामिळनाडूमध्ये, कोणत्याही प्रांतामध्ये जा तिथे त्यांच्या त्यांच्या दुकानांमध्ये त्यांच्या भाषांमधील पाट्या असतात, मग आमच्या महाराष्ट्रात का नाही?” असा प्रश्न राज ठाकरे या व्हिडीओमध्ये सभेतील भाषणात उपस्थित करताना दिसत आहेत. “नावं लिहिलं तरी मोठं, ठळकं दिसेल असं लिहिलं पाहिजे,” असंही राज या भाषणात म्हणाले होते.
१)
२)
३)
४)
५)
दरम्यान, मराठी भाषेसाठी आग्रह धरत आंदोलनं करणाऱ्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून हे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकाचं असल्याचं म्हटलं आहे.