सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ थक्क करणारे असतात, तर काही फार मजेशीर असतात. सध्या असाच माकडाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. वृंदावन येथील श्री रंगनाथ जी मंदिरातील एक खोडकर माकड एका व्यक्तीचा आयफोन चोरून पसार झाला. यावेळी माकड आयफोन पळवून थेट एका मोठ्या भिंतीवर जाऊन बसला. यावेळी आयफोन मिळवण्यासाठी व्यक्तीची सुरू असलेली धडपड पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले.

माकड इतका हुशार होता की, त्याने जोपर्यंत स्वतःहून तो व्यक्ती फोन परत घेण्यासाठी पुढे आला नाही तोपर्यंत फोन परत केला नाही. या घटनेचा व्हिडीओ आता युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओत दोन माकडं इमारतीच्या वर बसलेली दिसत आहेत. यातील एक माकड एका व्यक्तीच्या हातातील आयफोन घेऊन पळून गेला आणि थेट एका मोठ्या भिंतीवर जाऊन बसला. ती व्यक्ती माकडाला फ्रूटी देत आयफोन परत मिळवण्याचा प्रयत्न करतो. तो फ्रूटी माकडाच्या दिशेने फेकतो. जी पकडताच तो लगेच आयफोन खाली फेकतो. माकडाची ही हुशारी पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे.

मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या जेवणात आढळला मेलेला उंदीर; ग्राहक तीन दिवस हॉस्पिटलच्या बेडवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, @sevak_of_krsna नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, हा बिझनेस आहे. दुसरा युजर म्हणाला की, माझ्याबरोबरही हे घडले आहे. तर तिसऱ्या युजरने लिहिले की, माकडांची अन्न मिळवण्याची नवीन कल्पना आहे.