अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक शहरांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान अशा काही घटना समोर येत आहेत की, ज्यापासून भीती तर वाटते; पण अनेकदा हसायलाही येते. सध्या पुराच्या पाण्यातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यातील एका व्यक्तीची कृती पाहून तुम्हीही खूप हसाल. या व्हिडीओत पुलावरून वेगाने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात अडकलेला एक बाइकस्वार चक्क तंबाखू खाताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुलाच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या लोकांचा जमाव पुरात अडकलेल्या बाइकस्वाराला वाचविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच वेळी बाइकस्वार मात्र पुरात अडकूनही आरामात हातावर तंबाखू चोळत उभा आहे. या व्हिडीओवर गुजराती भाषेत ‘मावाप्रेमी’ आणि ‘जान जाये तो जाये; पर मावा ना जाये’, असे लिहिले आहे.

‘अरे हा अंपायर आहे की जोकर’; क्रिकेटच्या मैदानातील त्याच्या करामती पाहून तुम्हीही पोटधरून हसाल, पाहा मजेशीर VIDEO

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की, गर्दीतील बहुतांश लोक पुरात अडकलेल्या बाइकस्वाराचा व्हिडीओ बनवीत आहेत. त्याच वेळी अनेक लोक त्याला वाचविण्यासाठी कोणी तरी येईल या प्रतीक्षेत आहेत. मात्र, हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे ते स्पष्ट झालेले नाही.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स पुरात अडकलेला तो बाईकस्वार वाचला की नाही, असा प्रश्न विचारत आहेत; तर बहुतेक युजर्सनी त्याच्या तंबाखू खाण्याच्या कृतीची खिल्ली उडवली आहे.

“काँग्रेसचे लोक माझ्या खिशात” शिक्षिकेचा शाळेत दारू पिऊन धिंगाणा, मुख्याध्यापकाची पकडली कॉलर अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

यात अनेक युजर्सनी व्हायरल व्हिडीओवर सर्व प्रकारच्या मजेशीर कमेंट्सही केल्याचे दिसते आहे. अनेकांनी या बाइकस्वाराबद्दल सहानुभूती व्यक्त केली; तर काहींनी त्याला मूर्ख, असे म्हटले आहे. काही लोकांनी लिहिले की, भीतीपोटी त्याने तंबाखू खाण्यास सुरुवात केली; तर युजर्सनी म्हटले की, कदाचित तो तंबाखू खाऊन काहीतरी आश्चर्यकारक करेल. काहींनी त्याला मृत्यूलाही न घाबरता, तंबाखू खाताना पाहून त्याच्या धाडसाला सलाम केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण वाहत्या पाण्यात अशाप्रकारे धाडस अनेकदा जीवघेणे ठरु शकते. त्यामुळे मुसळधार पाऊस असेल तर नेहमी वाहत्या पाण्यापासून दूर रहा. जीव महत्वाचा असेल तर सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबा. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, कारण पावसाळ्यात खेड्यापाड्यांमध्ये नद्या धोक्याची पातळी ओलंडतात अशावेळी त्यातून प्रवास करणे जीवघेणे ठरते.