Child Trapped In A Window : लहान मुलं जितकी निरागस असतात तितकीच मस्तीखोर अन् चंचल असतात. एक क्षणही ते एका जागी शांत बसू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर सतत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. जरा नजर हटेपर्यंत मुलं काही ना नाही गोंधळ घालतात. मुलांना त्यांचे चांगले-वाईट काहीच कळत नाही. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ही पालकांची असते त्यामुळे पालकांना नेहमीच सतर्क राहावे लागते.

अनेकदा पालकांचे कामाच्या नादात मुलांकडे दुर्लक्ष होत पण त्यांची ही एक चूक मुलांच्या जीवावर बेतू शकते. लहान मुलांबरोबर होणार्‍या अपघातांचे कित्येक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एक व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडत आहे.

व्हायरल व्हिडिओ पुण्यातील आहे. व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी एका उंच इमातरीच्या तिसऱ्या मजल्याच्या खिडकी बाहेर लटकल्याचे दिसत आहे. खेळता खेळता चिमुकली खिडकीच्या बाहेर गेली आहे फक्त तिचं डोक खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलं आहे. चिमुकली इतक्या धोकादायपणे खिडकीत लटकत आहे जे पाहणे देखील शक्य होत नाही. दरम्यान, एक व्यक्ती चिमुकलीला वाचवताना दिसत आहे. व्हिडीओ समोरच्या इमारतीमधून कोणीतरी शुट केल्याचे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडी येथील खोपडे नगरमध्ये ही घटना घडली. या घटनेबाबतअग्निशमन दलाचे कर्मचारी योगेश अर्जुन चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की,” आज(ता. ८) सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी सोनवणे बिल्डिंगमध्ये उमेश सुतार नावाची व्यक्ती ओरडताना दिसली. त्यांचा आवाज ऐकून मी बाहेर गॅलरीत आलो पाहिले तर एक मुलगी (भाविका चांदणे, वय ४ वर्ष ) तिसर्‍या मजल्याच्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकली होती. पाहिल्यानंतर मी लगेच त्या बिल्डींगकडे धाव घेतली. बिल्डींगच्या तिसर्‍या माळ्यावर पोहोचलो तर घराला कुलूप होते व मुलगी घरात एकटी होती. त्या मुलीचा आई दुसर्‍या मुलीला शाळेत सोडून माघारी घरी येत होती. त्याच वेळेस मी तिथे पोहोचलो आणि आईकडून दरवाजा पटापट उघडून त्या मुलीला बेडरूमच्या खिडकीतून घरात खेचून घेतले आणि तिचा जीव वाचवला.”