Shocking video: आजकाल सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडीओचा भडीमार पाहायला मिळतो.आणि त्यात या रिल्ससाठी कोण काय करेल हे सांगता यायचं नाही. रिल्सला व्ह्युज, लाइक्ससाठी कोणत्याही थराला जातील काही सांगता यायच नाही. पण याच व्हिडीओसाठी एका आईला आपल्या बाळाचाही काही फरत पडत नसेल तर.आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?

आई वडिलांचं आणि त्यांच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारे पालक अनेक संकटांना सामोरे जात असतात. अगदी बाळ जन्माला आल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत दोघं आई बाबा आपल्या मुलांना सांभाळतात, त्यांचं रक्षण करतात. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ते आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. एवढंच नाही तर आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी त्यांचा जीव वर-खाली होतो. अशाच एका आईनं रिलच्या नादात आपल्या लहान बाळाला मृत्यूच्या दारात पोहोचवलं..याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, धावत्या मुंबई लोकलच्या दरवाजामध्ये आई बाळाला घेऊन उभी आहे आणि शेजारीच एक लहान मुलगी उभी आहे. लोकलचा वेग इतका जास्त आहे की ही लहान मुलीचा सहज तोल जाऊ शकतो. मात्र असं असूनही आई मात्र व्हिडीओ काढण्यात व्यस्थ होती. यावेळी स्वत:बरोबरच पोटच्या लेकरांचाही जीव या महिलेनं धोक्यात टाकला आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sanket_dange_lifeline नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी महिलेवर टीका केली आहे. मुलाच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री करण्याऐवजी काही सेकंदांच्या लहान रीलला जास्त महत्त्व देणाऱ्या महिलेवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. एकानं म्हंटलंय, “ज्यांना मुलं होत नाही त्यांना किंमत विचारा”