Priyanka Diwate Interview: प्रियांका दिवटे ही मोटिव्हेशनल स्पीकर, रीलस्टार, डान्सर आणि युट्यूबर म्हणून सर्वांना परिचित आहे. भन्नाट डान्स करण्यासह उत्तम मेकअप आर्टिस्ट अशा विविध कला अंगी असणाऱ्या प्रियांकाने लोकसत्ताच्या ‘इन्फ्ल्यूएंसरच्या जगात’ या खास सीरिजमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या जीवनातील अनेक चांगले वाईट प्रसंग मनमोकळेपणाने इथे शेअर केले. एखादं स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं, शिवाय मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी सकारात्मक कसं रहायचं? यावरही तिने भाष्य केलं आहे.
प्रियंकाने लहान असल्यापासून जे करायचं ठरवलं होतं ते सर्व झाल्याचं सांगितलं. परंतु, या प्रवासात तिच्या हक्काचे आणि सर्वात जवळचे असणारे वडील तिला सोडून गेल्याने तिच्यावर वाईट काळ ओढावल्याचा प्रसंगही तिने सांगितला. यावेळी ती खूप भावनिक झाली होती. तिने सांगितलं की, तिच्या वडिलांची एक इच्छा होती, ती म्हणजे त्यांना प्रियांकाला टीव्हीवर पाहायचं होतं आणि त्यांनी तिला टीव्हीवर पाहिलंदेखील. पण, यानंतर काही दिवसांतच त्यांचं निधन झालं.




वडिलांच्या निधनानंतर जवळची माणसं आपल्यापासून दूर गेल्यावर त्याचा करिअवर आणि आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो, याबाबतचा संपूर्ण भावनिक आणि प्रेरणादायी प्रवास प्रियांकाने लोकसत्ताच्या ‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ या नव्या सीरिजमध्ये सांगितला. शिवाय जीवनातील अनेक चढ-उतार पार करून आता प्रियांकाने एक मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
खरं तर प्रियांका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेमस झाली ती तिच्या मोटिव्हेशनल व्हिडीओमुळे. शिवाय आपण सुरुवातीला लहान लहान व्हिडीओ बनवायला सुरुवात केली आणि नंतर ते लोकांना कसे आवडायला लागले हे देखील तिने सांगितलं. पण, हे व्हिडीओ बनवताना तिच्या वडिलांचा तिला पूर्ण पाठिंबा असल्याचंही तिने जाणीवपूर्वक सांगितलं.
वडिलांनीच मोटिव्हेट केलं –
ती म्हणाली, मी खूप मोठं व्हायचं स्वप्न पहिल्यापासून पाहिलं होतं. शिवाय मला या सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्या कुटुंबीयांनी खूप साथ दिली आहे. माझे वडीलच माझ्यासाठी एक प्रेरणास्त्रोत होते. ते मला अशा गोष्टी करण्यासाठी नेहमी मोटिव्हेट करायचे.
डान्स, पेंटिंग, मेंहदी, रांगोळी आणि मेकअप आर्टिस्ट –
प्रियांकाने आता मेकअप स्टुडिओ सुरू केला आहे, परंतु ती एक रीलस्टार आणि इन्फ्ल्यूएंसर असूनही ती मेकअपच्या क्षेत्रात कशी आली, याबाबत प्रश्न विचारला असता ती म्हणाली, मला लहानपणापासूनच मेकअपची आवड आहे. मेकअपचं सामान गोळा करणं हा माझा छंद होता आणि आजही आहे. शिवाय मला सुरुवातीपासूनच या क्षेत्रात करिअर करायचं होतं. अशा विविध प्रश्नांवर तिने यावेळी स्पष्ट उत्तरं दिली.
नेहमी सकारात्मक कसं रहायचं?
बॉडी शेमिंग, आयुष्यातील संघर्ष, लॉकडाऊनमध्ये समजलेलं पैशांचं महत्व आणि दुबईमध्ये मिळालेला अवॉर्ड याबाबतचे अनेक मजेदार आणि तितकेच प्रेरणादायी किस्से तिने सांगितले. शिवाय ती यशस्वी वाटचाल करत असताना तिच्या आजूबाजूच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती? आयुष्यात नकारात्मक लोकांकडे तिने कसं दुर्लक्ष केलं. ट्रोलर्सना नेमकं प्रियांकाने काय उत्तर दिलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.