Dhoni Autograph BMW :  कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी चाहते आजही तेवढेच आतूर असतात जेवढे पूर्वी असायचे. निवृत्तीनंतरही धोनीची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. उलट पूर्वीपेक्षा त्याची क्रेझ अधिकच वाढल्याचे दिसत आहे. माही देखील त्याच्या चाहत्यांवर खूप प्रेम करतो, तसेच चाहत्यांना कधी तो निराश करत नाही. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ याचा पुरावा आहे. या व्हिडीओमध्ये धोनी चाहत्याची ऑटोग्राफची इच्छा त्याच्या म्हणण्यानुसार पूर्ण करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धोनी एका कारच्या जवळ उभा असल्याचे दिसत आहे. तो आत बसताच एक व्यक्ती त्याला ऑटोग्राफ कुठे आणि कसा द्यायचा हे समजावून सांगू लागतो.

यानंतर तो धोनीला कारच्या हँड रेस्टवर ऑटोग्राफ देण्यास सांगतो. धोनी त्या व्यक्तीचा मान ठेऊ कारमध्ये मोठा ऑटोग्राफ देतो. धोनीची ही स्टाईल चाहत्यांनाही खूप आवडली आहे.

धोनीचा व्हायरल व्हिडीओ @bajaj.sumeetkumar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील धोनीच्या स्टाईलशिवाय सध्या त्याचा नवा लूकही पसंत केला जात आहे. व्हायरल क्लिपमध्ये माही काळ्या रंगाचे जॅकेट आणि हिरवी पँट परिधान करताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाँग हेअरसह धोनीचा क्लीन शेव्हन लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, माहीचा लूक मस्त आहे. दुसऱ्याने लिहिले की, ही आता भारतातील सर्वात महागडी कार बनली आहे.