Ms Dhoni Outstanding Video Viral On Internet : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीने फक्त मैदानच गाजवलं नाही, तर मैदानाबाहेरही कोट्यावधी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मैदानात खेळताना कॅप्टन कूल धोनी सर्व खेळाडूंना प्रेमाने समजावून सांगतो. पण मैदान सोडल्यावरही तो सामान्य माणसांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतो. त्यामुळे धोनीच्या स्वभावाचं नेहमीच कौतुक केलं जातं. धोनीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. पण इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धोनीचा अभिमान नक्कीच वाटेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

इंटरनेटवर एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनीने एका सुरक्षारक्षकाला दुचाकीवरून लिफ्ट दिल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ @mahiyank_78 नावाच्या यूजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत धोनी रांची येथील फार्म हाऊसवर स्पोर्ट्स बाईकवरू प्रवास करत असल्याचं दिसत आहे. त्याचा सुरक्षारक्षक दुचाकीवर धोनीच्या पाठीमागे बसलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर धोनीचा फार्म हाऊस किती मोठा असेल, याचा अंदाज लावता येईल.

नक्की वाचा – ८ महिन्यांपासून महिलेचे अंतर्वस्त्र चोरायचा, सापळा रचला पण चोरट्याचा चेहरा पाहताच महिलेला बसला धक्का, कारण…

इथे पाहा व्हिडीओ

कारण सुरक्षारक्षकाला गेटवर पोहोचण्यासाठी खूप वेळ लागत असेल. सुरक्षारक्षकाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून माहीने त्याची मदत केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी धोनीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. चाहते धोनी धोनी म्हणत चिअर अप करत असल्याचंही या व्हिडीओत ऐकायला येत आहे आणि माहीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत.