Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांचा या योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवातही झाली आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३०० रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, याची प्रचंड चर्चा झाली आणि अजूनही सुरू आहे. सोशल मीडियावर तर वेगवेगळ्य मीम्सच्या माध्यमातून यावर वेगवेगळे विनोदही पाहायला मिळाले. त्यामध्ये काही महिलांना पैसे मिळाले; तर काही अजूनही वाट बघत आहेत. अशातच ट्रेनमधील समोसे विकणाऱ्या एका विक्रेत्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘लाडकी बहीण‘ योजनेवरून तो विक्रेता नेमका काय म्हणत आहे? ते ऐकून पोट धरून हसाल

ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही पाहिलंच असेल की, कितीतरी फेरीवाले वेगवेगळे खाद्यपदार्थ घेऊन चकरा मारत असतात. यावेळी त्यांची मार्केटिंग स्टाईल ऐकून बऱ्याचदा हसू येतं. आपली वस्तू, पदार्थ विकण्यासाठी हे फेरीवाले भन्नाट गोष्टी बोलत असतात. दरम्यान, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक विक्रेता ट्रेनमध्ये समोसे विकत आहे. त्यानेही आपले समोसे विकण्याकरिता प्रवाशांचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी भन्नाट आयडिया वापरली आहे. हा विक्रेता म्हणतो “लाडक्या बहिणीचे तीन हजार आले, घ्या वीसचे चार समोसे… आता भाऊजीही म्हणणार नाहीत तू २० का खर्च केले” हे ऐकून ट्रेनमधले सगळे खासकरून महिला पोट धरून हसू लागल्या.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पोलीस भरतीला गेली अन् बाहेर येऊन ढसाढसा रडू लागली; बाप-लेकीचा VIDEO व्हायरल, पाहा नेमकं काय घडलं?

दरम्यान, ज्या महिला ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्यांना सप्टेंबर महिन्यासह जुलै आणि ऑगस्ट ,असे तीन महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. एकाच वेळी महिलांच्या खात्यात तीन हप्त्यांचे म्हणजे एकूण चार हजार ५०० रुपये जमा होतील. नंतरसुद्धा ही योजना सुरू राहणार असून, महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

शेतजमीनीच्या अटीत केला मोठा बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारने सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या. अगोदरच्या अटींप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. म्हणजेच पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नव्हता. आता मात्र सरकारने ही अटच काढून टाकली आहे. त्यामुळे आता पाच एकरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजेसाठी पात्र ठरवले जाणार आहे. पण, सरकारने अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवलेली आहे.