Mumbai Local Shocking Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. यात महिलांच्या डब्यातही रोजच्या रोज भांडण पाहायला मिळतात. पण अनेकदा महिलांना लेडिज डब्यात सुरक्षित वाटत नाही. अनेकदा काही पुरुष आपलीच ट्रेन समजून महिलांच्या डब्यात चढतात आणि त्यांना त्रास देतात. सध्या अशीच एक घटना मुंबईतील बोरीवलीत घडलीय. जिथे एक माणूस लेडिज डब्यात चढून महिलांशी उद्धटपणे वागतोय, नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

मुंबई लोकल व्हायरल व्हिडीओ (Mumbai Local Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या धक्कादायक व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस मुंबई लोकलमधील बोरिवली येथे लेडीज डब्यात चढला आहे. या डब्यात चढून तो लोकलमध्ये असलेल्या महिलांशी उद्धटपणे वागताना दिसतोय. रेल्वेच्या दरवाजाला लटकून हा तरूण अद्वातद्वा बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो नेमकं काय बोलतोय हे कळत नाहीय. पण त्याच्या या विकृतीवर महिला भडकताना दिसते. तसंच ती असं म्हणते, ”जा हे सगळं जाऊन तुझ्या आईला बोल”

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @primezewsmarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १६.४ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच “बोरीवली लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घुसत तरुणानं हद्दच पार केली, महिला ओरडत राहिल्या अन्…” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया (Train Shocking Video)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मानलं ताईला परप्रांतीयाला उत्तर दिले आता पोलीस पण देतील”, तर दुसऱ्याने “चार पाच जणींनी या नराधमाला चालत्या ट्रेनमध्ये लाथ घालून फेकलं असते तर अधिक उत्तम झालं असतं” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला ”काहीच बायका बोलल्या असतील त्याला, बाकीच्या फक्त बघ्याची भूमिका करत असतील. सगळ्यांनी मिळून चांगला धुतला असता ना पुन्हा हिंमत झाली नसती त्याची कधी”