Mumbai local Viral Video : राज्यात हल्ली महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली असून, राज्यात सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटनांत मुंबई पहिल्या स्थानावर; तर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच आता मुंबईच्या लोकलमध्ये एका धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. रात्रीचे महिलांसाठी घराबाहेर पडणे सुरक्षित नाही; मात्र आता दिवसाही महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मुंबई लोकलच्या महिला डब्यात एका तरुणाने पँट काढून गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की मुंबईत चाललंय तरी काय?

या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी ट्रेनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. पण अनेकदा अशा काही घटना आपल्या डोळ्यांसमोर घडतात ज्या थक्क करणाऱ्या असतात. सध्या असाच काहीसा धक्कादायक प्रकार ट्रेनमध्ये घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, नारंगी रंगाचा टी-शर्ट आणि निळा पँट घातलेला तो माणूस दाराजवळ उभा असल्याचे दिसून येते. महिला त्या माणसाला खाली उतरण्यास सांगत असल्याचे ऐकू येते: “लेडीज डब्बा है, समज नहीं आता?” (हा महिलांचा डबा आहे, समजला नाही का?). दुसरी महिला म्हणते तो त्याची पँट काढत होता.पुढे व्हिडिओमध्ये तो त्याच्या पँटची बटणे काढतानाही दिसत आहे. काही वेळाने, तो पुन्हा आतमध्ये येतो आणि सीटवर बसतो. पण ती संतप्त महिला त्याला “ट्रेनमधून खाली उतर म्हणत असल्याचे ऐकू येते.थोड्यावेळानं दुसऱ्या स्टेशनवर, तो माणूस ट्रेनमधून उतरतो.

पाहा व्हिडीओ

नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात एका पुरूषाचे पॅन्टचे झिप काढून अयोग्य वर्तन करत असल्याचा व्हिडीओ काढला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, चुनाभट्टी स्टेशनवर सकाळी ८ वाजताच्या सुमारास एक “मद्यधुंद” पुरूष महिलांच्या डब्यात चढला आणि खाली उतरण्यास नकार देऊ लागला. “त्याने त्याची पॅन्ट काढण्याचा प्रयत्न केला,” असे तिने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना पुढे लिहिले.रेल्वे हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला; कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि प्लॅटफॉर्मवर पोलिसही नव्हते,” असे या पोस्टमध्ये मुंबई पोलिस आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाला टॅग करताना लिहिले.