Mumbai Rains Video: गेल्या २४ तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. सोशल मीडियावर संतप्त प्रवासी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडीओ फोटोच्या माध्यमातून ट्रेनचे अपडेट्स शेअर करत आहेत. दरम्यान, बदलापूर रेल्वे स्थानक आणि अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने बदलापूरहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून स्थानकावर दिली जाते आहे. बदलापूर ते अंबरनाथ मधील रेल्वे रुळाचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, कल्याण, डोंबिवली परिसरात मागील तीन तासात जोरदार पाऊस झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरात मागील तीन तासात ५७ मिमी तर कल्याण शहरात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. डोंबिवली परिसरातही मागील तीन तासात ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बदलापूर- अंबरनाथ मधील रेल्वे रूळ जलमय

हे ही वाचा<< पुढील दोन आठवड्यात ‘या’ तारखांना जोरदार पावसाचा अंदाज! मुंबईसह राज्यातील पावसाचे रूप कसे असेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडले असून पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक ठप्प आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूकदेखील बंद आहे. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असल्याने सर्वच ट्रेन आता उशिराने धावत आहेत.