Viral Post Man Sleeping In Mumbai Local Train : मुंबई लोकल ट्रेनमध्ये दररोज तुम्हाला काही ना काही वेगळंच बघायला मिळते. घरातलं आवरून ट्रेन पकडण्यासाठी धावपळ, सीटवरून भांडण, कोणी घरातूनच भांडून, तर कोणी छोट्या-छोट्या गोष्टी विकून पोट भरणारे अनेक मुंबईकर तुम्हाला यामध्ये दिसतात. यातच काही अंतरंगी प्रवासी सुद्धा असतात; जे छोट्या-मोठ्या गोष्टी करून इतरांचे लक्ष वेधून घेत असतात. कोण मोठमोठ्याने गाणी गुणगुणतं, कोण रील शूट करतो, तर कोण बसायला जागा नाही म्हणून फोल्डिंग टेबल बसायला घेऊन येतं.

आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो. अनेकदा ट्रेनमध्ये चढल्यावर कोण कुठे उतरणार हे विचारून बसण्यासाठी सोय करावी लागते. पण, आज एका प्रवाशाने वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. आपल्याला तिथून कोणीही उठवणार नाही किंवा कोणत्याही प्रवाशाला त्याची सीट द्यावी लागणार नाही म्हणून प्रवाशाने बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी बॅगा, जड सामान ठेवण्याच्या रॅकचा उपयोग केला आहे. रॅकवर एक प्रायव्हसी निवांत झोपी गेला आणि हाताचा उशी म्हणून वापर केला आहे.

माणसाला या शहरात विश्रांतीसाठी जागा सापडत नाही (Viral Video)

मुंबई लोकलमध्ये अनेक प्रवासी कामावरून थकून तर काही जण घर काम करून ऑफिसला जाण्यासाठी प्रवास करतात. त्यामुळे स्टेशनला उतरण्याआधी ५ ते १० मिनिटांची सुखाची झोप ट्रेनमध्ये झाली तर प्रवाशाला एकदम फ्रेश वाटायला मदत होते. त्यामुळेच प्रवाशाची अनोखी कल्पना पाहून सहप्रवासी त्याच्याकडे आश्चर्याने बघत आहेत. पण, कोणीही त्याला उठवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. पण काही जणांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आणि असे म्हटले की ट्रेनच्या अचानक झटक्याने गंभीर अपघात सुद्धा होऊ शकतो.

पोस्ट नक्की बघा…

Mumbaiiiii Localllll
byu/HedgehogAway8862 inmumbai

सोशल मीडियावर ही पोस्ट @HedgehogAway8862 या Reddit अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. या फोटोवर मजेदार कमेंट्स येत आहेत, तर काही युजर्स तो किती ताणतणावग्रस्त किंवा थकलेले आहेत याबद्दल चिंता व्यक्त तर वारंवार प्रवास करणारे म्हणतात की, “अशा घटना असामान्य नाहीत. जिथे प्रवाशांना बसण्यासाठी वा उभे राहण्यासाठी जागा शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे”, “माणसाला या शहरात विश्रांतीसाठी जागा सापडत नाही”, “तो किती थकलेला असेल याचा विचार करा”, “तो जगण्यासाठी आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी कष्ट करत आहे”, “मला त्याचा थकवा समजू शकतो” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.