जीवनात संगीताचं फार महत्त्व आहे. मराठी, हिंदी गाण्यांच्या काही ओळी जीवनातील गोष्टींशी निगडित असतात; तर काही जीवनाचा खरा अर्थ सांगून जातात. आज सोशल मीडियावर असंच काहीस पाहायला मिळालं आहे. मुंबई पोलिस नेहमीच त्यांच्या पोस्टमधून वाहनचालकांना मोलाचा संदेश देत असतात. आज त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात गाण्याच्या मदतीनं हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांना संदेश दिला आहे.

मुंबई पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या अनेक जणांचा एक व्हिडीओ तयार केला आहे. हेल्मेट घातलेल्या आणि हेल्मेट न घातलेल्या अशा काही दुचाकीचालकांच्या फोटोंना एका हिंदी गाण्याच्या ओळींसोबत जोडलं आहे. हम-तुम अलग हैं… फर्क है, फर्क है, फर्क है, असे गाण्याचे बोल एडिट करून, ते हेल्मेट घालणाऱ्या आणि हेल्मेट न घालणाऱ्या लोकांच्या फोटोंशी जोडण्यात आले आहेत. गाण्याचे बोल ‘फर्क है’ या हिंदी गाण्याच्या अल्बममधील आहे. ‘सुरक्षित प्रवासाची हमी म्हणजेच सुखद प्रवास’ अशा शब्दांत मुंबई पोलिसांनी वाहनचालकांना मोलाचा संदेश दिला आहे. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी मुंबई पोलिसांची खास पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघाच.

हेही वाचा… नितीन गडकरींनी केला हायड्रोजनवर चालणाऱ्या बसमधून प्रवास, फोटो बघून नेटकरी म्हणाले, “काही वर्षांत सरकारी…”

पोस्ट नक्की बघा :

फरक ओळखा, हेल्मेट घाला :
हेल्मेट घालण्यामुळे फक्त तुमचं संरक्षणच होत नाही, तर तुम्हाला दंड भरण्यापासूनसुद्धा ते वाचवतं. वेळोवेळी मुंबई पोलिस या गोष्टीची आठवण दुचाकीचालकांना करून देत असतात. आज मुंबई पोलिसांनी हेल्मेट घालणाऱ्या आणि हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीचालकांमध्ये किती फरक असतो हे या गाण्याच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलं आहे. ‘फर्क है’ हे २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी अल्बममधील गाणं आहे. या गाण्याचे बोल सुज़ोन (suzonn) यांनी लिहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर हे गाणं खुपचं ट्रेंड होत आहे आणि अनेक जण यावर मजेशीर व्हिडीओ बनवताना दिसून येत आहेत. तर आता मुंबई पोलिसांनीसुद्धा या गाण्यावर व्हिडीओ बनवून दुचाकीस्वारांना संदेश दिला आहे.गाण्याचा योग्य ठिकाणी उपयोग करून मुंबई पोलिसांनी हेल्मेट घातल्यानं “फरक पडतो” असा संदेश देणारी रील बनवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ @mumbaipolice या त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. “हेल्मेट घातल्यानं तुमच्या सुरक्षेत ‘फरक’ पडतो”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हेल्मेट घालणं प्रत्येक दुचाकीचलकांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे; पण तरीसुद्धा काही दुचाकीचालक हेल्मेट घालण्याचा कंटाळा करतात आणि अनेक संकटांना सामोरे जातात. पण, प्रत्येक वेळी मुंबई पोलिस या दुचाकीचालकांना हेल्मेट घालण्याचे महत्त्व पटवून देत असतात.