रेल्वे स्थानक व शहरातील अन्य भागांत प्रवाशांकडून रिक्षाचालक जास्त पैसे घेतात. गेल्या काही वर्षापासून मुंबई , उपनगर , नवी मुंबई , पनवेल भागात रिक्षा चालकांच्या मनमानीत वाढ झाली असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जास्त भाड लावण्यापासून रिक्षामध्ये हल्ली सामानाचेही पैसै घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस रिक्षाचालकांची मुजोरी वाढतच चालली असली तरी मुंबईकरही काही कमी नाहीत. अशाच एका मुंबईकर व्यक्तीने रिक्षाचालकानं लगेजचं ज्यादा भाडं सांगितल्यानंतर एक भन्नाट जुगाड केला आहे. हा जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल मानलं बुवा..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्यक्ती सामानासोबत बाईकवरून प्रवास करतो. त्यामुळे अर्थातच रिक्षाचे पैसे वाचले. पण बाईकवरून प्रवास करताना प्रश्न उरतो तो सामानाचा. पण काळजी करण्याचं कारण नाही. त्यानं सामान नेण्यासाठी नाचं असलेल्या दोन मोठ्या बॅगा घेतल्या आहेत. अन् या बॅगा तो चक्क एखाद्या गाडीसारखा ओढत नेतोय. त्यामुळे अर्थातच सामानाचं वजन देखील जाणवत नाही. आणि पैसे देखील वाचतात. रस्त्यावरील प्रत्येकजण या व्यक्तीकडे मोठ्या कुतुहलाने पाहात आहे. या व्यक्तीचं धाडस पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी त्यांची खिल्ली देखील उडवली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मोबाईल चार्जिंगला लावून बेडवर ठेवता? ‘हा’ धक्कादायक VIDEO पाहून पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, हा व्हिडीओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. दरम्यान तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा