Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चार तरुण मुले लुंगी आणि शर्टवर मनसोक्त नाचताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघावासा वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की निळ्या रंगाची लुंगी आणि पांढरा शर्ट घातलेली चार तरुण डान्स करत आहे. १९९७ च्या लोकप्रिय ‘Backstreet’s Back Everybody’ या लोकप्रिय गाण्यावर ते डान्स करताना दिसत आहे. या तरुणांचा अप्रतिम डान्स पाहून कोणीही अवाक् होईल. त्यांची ऊर्जा आणि डान्स करण्याच्या हटके पद्धतीमुळे सध्या सोशल मीडिया ते चांगलेच चर्चेत आले आहे. नृत्यदिग्दर्शक तज्जू राजील यांनी हा अप्रतिम डान्स बसवला आहे.

तुम्हाला प्रश्न पडला असेल ही डान्स करणारी तरुण मुले कोण? तर या चार तरुणांचा ‘mundu-clad men’ नावाच ग्रुप आहे. ज्यांना मल्याळम डान्स रिअॅलिटी शो D4 Dance मधून चांगली प्रसिद्धी मिळाली होती. सोशल मीडियावर त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ते त्यांचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

हेही वाचा : “थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

74x__manavalans_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सामान्य जगात आम्ही असामान्य आहोत.” हा व्हिडीओ २ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. अनेक युजर्सना त्यांचा डान्स खूप आवडला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान, मी Backstreet’s Back चा खूप मोठा चाहता आहे” तर एका युजरने लिहिलेय, “काय सुंदर समन्वय साधता तुम्ही” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर डान्स करताहेत. पुन्हा पुन्हा बघावा असं वाटतो.” काही लोकांनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mundu clad gang boys dance amazingly on lungi shirt watch dance steps on iconic bsb hit everybody song video goes viral ndj
First published on: 27-03-2024 at 10:58 IST