एका महिलेने तिच्या घराशेजारी राहणाऱ्या लहान मुलांवर आपल्या किचनमधील केळी चोरल्याचा आरोप करत तब्बल ५० हजार रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेने मुलांविरोधातात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. महिलेने चोरीचा आरोप केलेली मुलं ५ ते १२ वयोगटातील आहेत. महिलेच्या या कृत्यामुळे मुलांचे आई-वडील आश्चर्यचकित झाले आहेत.
ही घटना थायलंडच्या इसान प्रांतातील बुरीराम येथील आहे. पालकांनी स्थानिक मीडियाला सांगितलं की, कुंग नावाच्या ३३ वर्षीय महिलेने आमच्या मुलांविरोधात पोलिसांकेड तक्रार केली आहे. या तक्रारीत तिने मुलांनी घरातील मालमत्तेचे नुकसान करत किचनमधील केळी चोरल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा- चार वर्षाच्या मुलीच्या पोटातून निघाले तब्बल ६१ चुंबकाचे मणी; ३ तास चाललं ऑपरेशन
धक्कादायक बाब म्हणजे कुंगने या प्रकरणी ५६ हजार रुपयांची भरपाई मागितली आहे. प्रत्येक मुलाच्या पालकांनी तिला ७ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तिने केली आहे. मात्र, केळीच्या घडाची भरपाई म्हणून ७ हजार देणं जास्त असल्याचं पालकांचे म्हणणं आहे. Thaiger च्या वृत्तानुसार, काही पालकांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी कुंगला पैसे दिले आहेत. मात्र, काही पालकांनी हे खोट आणि चुकीचं असल्याचे सांगत दंड भरण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, या घटनेतील एका मुलाने सांगितले त्यांच्यावर आरोप करणारी कुंग नावाची महिला त्याच्या मित्राची आई आहे. काही दिवसांपूर्वी तो आणि त्याचे मित्र मित्राच्या घरी गेले असता. त्यांनी किचनमधील केळीचा घड खाल्ला. मात्र, सर्वांनी फक्त केळी खाल्ली आहेत, चोरी केली नाही शिवाय नुकसान तर काहीच केलेलं नाही.