नेटफ्लिक्सची टॉप सीरीज Squid Game च्या क्रिप्टोकरेंसीची झेप; गुंतवणूकदार रातोरात झाले श्रीमंत!

स्क्विड गेमची लोकप्रियता इतकी आहे की त्याच्या चाहत्यांची प्रचंड संख्या पाहता, स्क्विड क्रिप्टोकरन्सी देखील लॉंच केली गेली.

Squid Games cryptocurrency
स्क्विड गेम क्रिप्टोकरेंसी (फोटो: प्रातिनिधिक )

तुम्ही नेटफ्लिक्सवर असाल, तर तुम्हाला स्क्विड गेम या कोरियन मालिकेबद्दल माहिती असेलच, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. स्क्विड गेमची लोकप्रियता इतकी आहे की त्याच्या चाहत्यांची प्रचंड संख्या पाहता, स्क्विड क्रिप्टोकरन्सी देखील लॉंच केली गेली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्क्विड गेमप्रमाणेच, त्याच्या क्रिप्टोकरन्सीने देखील हिट ठरली आहे आणि अनेक लोकांना रातोरात श्रीमंत केले आहे.

स्क्विड क्रिप्टोकरन्सीची धूम

दक्षिण कोरियन मालिका स्क्विड गेमकडे स्वतःच्या ब्रँड नावाची क्रिप्टोकरन्सी आहे जी सध्या हिट ठरली आहे. स्क्विड गेमकने गेल्या २४ तासात २४०० टक्क्यांनी झेप घेतली आहे आणि $२.२२ वर व्यापार होत आहे. CNBC च्या अहवालानुसार, स्क्विड गेमचे मार्केट कॅप $१७४ दशलक्ष पर्यंत पोहोचले आहे. भारतीय रुपयांमध्ये तेरा अब्ज पस्तीस कोटीपेक्षाही जास्त ही किंमत आहे.

( हे ही वाचा: “पुनीत राजकुमार यांचे ‘ते’ शब्द खरे ठरले”, चाहत्यांना भावना अनावर, चित्रपटातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल! )

स्क्विड चाहत्यांसाठी गेमिंग नाणे तयार झाले

स्क्विड गेम मालिकेची लोकप्रियता पाहून, गेमर्सनी एक ऑनलाइन गेम तयार केला आहे ज्यासाठी वापरकर्त्याला स्क्विड क्रिप्टोकरन्सी खेळण्याची आवश्यकता आहे. स्क्विड ही एक प्रकारची प्ले-टू-अर्न क्रिप्टोकरन्सी आहे जिथे वापरकर्ते गेम खेळण्यासाठी टोकन विकत घेतात आणि जिंकून अधिक टोकन मिळवतात.

तुम्ही स्क्विड क्रिप्टोकरेंसीची तेजी अशा प्रकारे समजू शकता की कॉइन मार्केट कैपच्या डेटानुसार, ही क्रिप्टोकरन्सी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.४० वाजता 2.80 डॉलर व्यापार करत होती, जी १०१४ टक्क्यांनी वाढली होती. स्क्विड डिजिटल टोकनची मात्रा मागील २४ तासांमध्ये १२३ टक्क्यांनी वाढून ५५,१३,६८१ डॉलर पोहोचली आहे.

( हे ही वाचा: Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” )

वापरकर्ते त्यांचे टोकन विकू शकत नाहीत

तथापि, वापरकर्त्यांना त्यांच्या टोकन्सची पुनर्विक्री करण्याची परवानगी न दिल्याबद्दल स्क्विडवर टीकाही झाली आहे. यामुळे युजरला खूप विचार करून त्यात पैसे गुंतवण्याआधी पाऊल टाकावे लागते.नेटफ्लिक्सवर प्रसारित होणारी स्क्विड गेम मालिका सध्या एक व्हायरल सनसनाटी आहे. ही कथा काही लोकांची आहे जे पैशासाठी मुलांना धोकादायक मृत्यूचे खेळ खेळण्यास भाग पाडतात. नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवर हा सर्वात जास्त पाहिला जाणारा शो राहिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Netflixs top series squid games cryptocurrency goes high investors got rich overnight ttg

ताज्या बातम्या