New Scam Viral Video: आजकाल लोकांना सहजासहजी कोणीच फसवू शकत नाही. मग ती ऑनलाइन फसवणूक असो, बाजारात असो किंवा कुठेही. पण फसवणूक करणारेही नवनवीन युक्त्या शोधून लोकांना लुटत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात एक विचित्र फसवणूक समोर आली आहे. एका तरुणाने कपड्यांच्या दुकानात स्वतःलाच ग्राहक आणि दुकानदार असल्याचं भासवून काही सेकंदांत रोख रक्कम घेऊन पळ काढला.
दुकानदार आणि ग्राहकाची अशी केली फसवणूक (Scam in Market Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भारतातील एका कपड्यांच्या दुकान दिसत आहे, पण याचं नेमकं ठिकाण माहित नाही. व्हिडीओत आपण पाहू शकतो की एक तरुण दुकानात विक्रेता आणि ग्राहक यांच्या मध्ये असलेल्या प्लॅटफॉर्मवर बसलेला दिसतो, जिथे तो दोन्ही भूमिका सहज निभावू शकतो.
व्हिडिओमध्ये एका क्षणी तो तरुण महिला ग्राहकांशी अशा पद्धतीने बोलतो की तोच दुकानदार आहे असं त्यांना वाटतं. तर पुढच्या क्षणी तो खऱ्या दुकानदाराशी अशा रीतीने बोलतो जसं की तो ग्राहकांसोबत आला आहे. व्हिडिओच्या शेवटी, ती महिला तरुणालाच दुकानदार समजून त्याला पैसे देते, आणि त्यावेळी खरा दुकानदार कपडे लावण्यात व्यस्त असतो. तेवढ्यात हा तरुण पैसे मोजत मोजत शांतपणे दुकानातून बाहेर पडतो आणि बाहेर गेल्यावर धावत निघून जातो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @theindianbreakdown या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.२ मिलियनच्या वर व्ह्यूज आले आहेत. तसंच “या माणसाने ग्राहक आणि दुकानदार दोघांनाही फसवून, दोघांसोबत असल्याचं नाटक केलं आणि पैसे घेऊन पळून गेला.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान हा व्हिडीओ भारतातील आहे पण नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया (New Fraud Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप तीक्ष्ण आणि खूप हुशार दिसतोय हा चोर”, तर दुसऱ्याने “म्हणूनच तुम्ही QR स्कॅनर वापरून पेमेंट करावे. काही चुकीचं होणार नाही.” अशी कमेंट केली.