Nitish Kumar Meet Lalu Prasad Yadav Fact Check : बिहारमध्ये २०२५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यातील भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला आढळून आले. ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे तेजस्वी यादव यांनी स्वागत केले आणि नंतर नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनाही भेटल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री राबडी देवी देखील उपस्थित होत्या. या व्हिडीओमुळे आता बिहारच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच अनेक युजर्स या भेटीने बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवत आहेत. पण खरंच नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यातील भेटीचा व्हिडीओ खरा आहे का? असेल तर तो नेमका कधीचा आहे? याबाबत आम्ही तपास सुरु केला, ज्यातून हा व्हिडीओ खरा असल्याचे समोर आले, पण तो नेमका कधीचा आहे आपण पुढे सविस्तर जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर एसके गौतमने त्याच्या हँडलवर भ्रामक दावा करून व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.

इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल व्हिडिओवरून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला.

एका कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आम्हाला TV9hindi.com वरील बातमी सापडली.

https://www.tv9hindi.com/state/bihar/bihar-lalu-told-nitish-as-pm-contender-whoever-wants-to-become-prime-minister-au213-1452013.html

ही बातमी २०२२ मध्ये प्रकाशित झाली होती.

आम्हाला thefollowup.in या वेबसाइटवर देखील एक बातमी सापडली.

https://thefollowup.in/bihar/news/cm-nitish-met-lalu-yadav-before-going-to-delhi-25034.html

नवी दिल्लीला जाण्यापूर्वी नितीश कुमार यांनी लालू यादव यांची भेट घेतल्याचे या बातमीत म्हटले आहे.

यानंतर आम्हाला झी न्यूजच्या वेबसाइटवर १५ सप्टेंबर २०१५ रोजी अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला.

https://zeenews.india.com/video/india/nitish-kumar-meets-lalu-yadav-before-leaving-for-delhi-2506013.html

व्हिडीओचे शीर्षक होते: नितीश कुमार यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी घेतली लालू यादव यांची भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: नितीश कुमार आणि लालू यादव यांच्या भेटीचा जुना व्हिडिओ अलीकडील असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे. त्यामुळे हा भेटीचा व्हिडीओ खरा असला तरी तो आत्ताचा नाही तर २०२२ रोजीचा आहे, त्यामुळे आता व्हायरल होणारे दावे दिशाभूल करणारे आणि खोटे आहेत.