Monkey video viral : जंगलात राहणारे माकड बहुतांश वेळा कळपात फिरत असते. कधीकधी ही माकडं मानवी वस्तीतही येतात. ते जेव्हा एकत्र असतात, तेव्हा कुणीही त्यांच्याशी पंगा घ्यायला जात नाही. पण एखादं माकड चुकून मानववस्तीत आलं तर लोक त्याला त्रास देतात किंवा इजा करतात. काही लोक त्याला दगडंही मारण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे माकड जखमी होऊ शकते. पण सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पूर्णपणे वेगळाच आहे. तुम्हाला माहितीच आहे काही हातात दिसलं की ही माकडं लगेच ते हिसकावून घेतात आणि पळ काढतात. मात्र यामध्ये एका माकडाने चक्क एका पर्यटकाकडून ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा हिसकावून घेतला आणि जवळच्या झाडावर चढला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल…
तामिळनाडूतील लोकप्रिय पर्यटन स्थळ कोडाईकनाल येथे एका माकडाने एका पर्यटकाकडून ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा हिसकावून घेतला आणि जवळच्या झाडावर चढला, ज्यामुळे तो व्यक्ती चिंतेत पडला. हे माकड एका फांदीवर बसलं आणि एकामागून एक नोटा खाली उधळू लागलं. माकडाचा पैसे ‘वर्षाव’ करताना दाखवणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चोरीचे पैसे उधळण्यापूर्वी माकडानं हातात नोटांचा बंडल धरलेला दिसत आहे. नोटा रबर बँडने बांधलेल्या होत्या. या प्राण्याने काही सेकंदातच एकामागून एक नोटा बाहेर काढल्या आणि रोख रक्कम उधळून टाकल्या. त्याने सर्व पैसे खाली फेकून दिले. हा व्हिडीओ खूप मजेशीर असून तो पाहिल्यानंतर अनेकजण त्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. माकडाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @VVipinpatel नावाच्या एक्स काऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे, पर्यटन स्थळी अशा माकडांच्या दहशतीचे अनेक व्हिडिओ आहेत. गेल्या वर्षी याच लेण्यांना भेट देताना माकडाने केलेल्या हल्ल्याचा प्रसंग एका युजरने शेअर केला होता. “गुना गुहेत भयानक माकडाने आमच्यावर हल्ला केला. इथे येऊ नका. जर तुम्हाला माकडांनी हल्ला करावा असे वाटत असेल तर इथे या,” असे त्यांनी म्हटले आहे.