Viral Video: तुम्ही वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, तसेच फिट राहण्यासाठी व्यायामशाळेत जाता आणि तिथे प्रशिक्षक तुम्हाला वेळोवेळी कोणता व्यायाम करायचा, तो व्यायाम कोणत्या उपकरणांवर कशा पद्धतीने करायचा याचा सल्ला देत असतात. पण, आज व्हायरल व्हिडीओत एका तरुणाने व्यायाम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेडमिलवर धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे.
इंडिया टुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ओदिशामधील राऊरकेला येथील रहिवासी सुमित सिंगने तब्बल १२ तास ट्रेडमिलवर धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव कोरलं आहे. सुमितने १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी ट्रेडमिलवर धावण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत सुमित ट्रेडमिलवर धावून हा अनोखा विक्रम पूर्ण केला आहे. तसेच ट्रेडमिलवर सलग १२ तास धावून त्याने ६८.०४ किलोमीटरचे अंतर पार केलं आहे. एकदा पाहाच हा व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
याअगोदर सुमित सिंगने २५ एप्रिल २०२३ ते १४ मे २०२३ या कालावधीत ३३ मॅरेथॉन पूर्ण केले आहेत. सुमितने उदितनगर स्टेडियमवर १३९२.६ किलोमीटरचे आश्चर्यकारक अंतर पार करून खेळाच्या क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. तर सुमितच्या उल्लेखनीय कामगिरीकडे बघता आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र देऊन त्याला सन्मानित देखील करण्यात आलं आहे.
याव्यतिरिक्त सुमित सिंगकडे अनेक प्रमाणपत्र आणि मेडल्स सुद्धा आहेत. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @sumitsinghultrarunner या युट्युब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी तरुणाला अभिनंदन करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. ट्रेडमिलवर सलग १२ तास धावून सुमित सिंगची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.