देशात ऑनलाइन गेमिंग उद्योग वेगाने वाढत आहे. वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर लोकांच्या वाढत्या संख्येमुळे सायबर धोकाही वाढला आहे. सायबर फसवणुकीतून ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी नॉर्टनच्या नवीन अहवालानुसार, भारतातील प्रत्येक चार ऑनलाइन गेमरपैकी तीन जणांना एकदा किंवा अनेक वेळा सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. त्यापैकी बहुतेकांना यामुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे.

काय सांगतो अहवाल?

अहवालानुसार, गेम खेळताना हॅकिंगमुळे प्रत्येक पाच भारतीय गेमरपैकी चार जणांनी पैसे गमावले आहेत. सायबर फसवणुकीमुळे त्यांना सरासरी ७,८९४ रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणजेच, सायबर फसवणुकीत ८० टक्क्यांहून अधिक ऑनलाइन गेमर्सनी पैसे गमावले आहेत. आर्थिक नुकसानाव्यतिरिक्त, अनेक पीडितांनी (सुमारे ३५ टक्के) सायबर हल्ल्यांद्वारे त्यांच्या गेमिंग उपकरणांवर नुकसान पोहचवणारे सॉफ्टवेअर स्थापित केल्याची नोंद केली आहे. त्याच वेळी, ऑनलाइन गेमिंग दरम्यान २९ टक्के लोकांना त्यांच्या खात्यात अनधिकृत प्रवेशाचा सामना करावा लागला आहे.

( हे ही वाचा: Photos: ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद मिळवताच भारतीय नेटीझन्सने शेअर केले भन्नाट मिम्स! )

या प्रकारच्या सायबर हल्ल्यामुळे, पाच पैकी दोन पेक्षा जास्त (४१ टक्के) फसव्या मार्गाने त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेशी तडजोड करण्यास भाग पाडले गेले आहे. याशिवाय, २८ टक्के बळी ते आहेत ज्यांनी त्यांच्या गेमिंग डिव्हाइसेसवर मालवेअर डाउनलोड केले आहेत आणि २६ टक्के असे आहेत ज्यांची खात्याची माहिती ऑनलाइन शेअर करून फसवणूक झाली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाचपैकी एक गेमर देखील आहे ज्यांची माहिती चोरली गेली आणि त्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन सार्वजनिक केली गेली.

सर्वेक्षणात भारतातील ७०३ ऑनलाइन गेमर्सचा समावेश

द हॅरिस पोलने केलेल्या जागतिक अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये भारतातील ७०३ ऑनलाइन गेमर्ससह आठ देशांतील १८ वर्षांवरील लोकांचा समावेश होता. सुमारे ५६ टक्के लोकांनी सांगितले की ते स्वतःच्या फायद्यासाठी गेममधील त्रुटी किंवा बगचा फायदा घेऊ शकतात.

( हे ही वाचा: वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य )

अहवालानुसार, प्रत्येक पाच ते दोन लोकांनी सांगितले की ते इतर वापरकर्त्यांचे गेमिंग खाते हॅक करण्यासाठी पैसे देण्याचा विचार करू शकतात. १० पैकी सहा लोकांनी (६२%) सांगितले की त्यांनी कोविड-१९ महामारी दरम्यान ऑनलाइन गेमिंग सुरू केले. ऑनलाइन गेमर्समध्ये सायबर सुरक्षा त्रुटींबाबत या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.