Viral video: शिक्षण हा प्रत्येकाचा वारसा आहे जो देशातील प्रत्येक व्यक्तीला जीवनात मोठी उंची देतो. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाचा विकास शक्य नाही आणि देशाची अर्थव्यवस्थाही प्रगती करू शकत नाही. शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. मात्र काही मुलांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही, लहानपणापासूनच जर पालकांनी शिक्षकांनी मुलांना त्यांच्या भाषेत समजावून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले तर त्यांना जाणीव होते. वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाहीत, तर मग पुढे मुलांवर बहुतांशी वाईट संगतीचा विपरीत परिणाम होतो. मुलांनी चांगलं वागावं, कधीच कोणाचा अपमान करू नये, त्यांना चांगलं काय, वाईट काय यातील फरक कळावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र, हीच मुलं जर चुकीच्या वळणाला गेली, तर आई-वडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाची राखरांगोळी झाल्यासारखी त्यांची स्थिती होते. म्हणूनच मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार होणं गरजेचं आहे.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये शिक्षणामुळे आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो आणि तेच न शिकल्यामुळे कशी वेळ येऊ शकते हे समोर आलं आहे.

दोन व्यक्ती सारखंच काम फक्त शिक्षणाच्या फरकानं दोघांचंही आयुष्य वेगवेगळं झालंय. हा असा व्हिडीओ आहे की प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलांना दाखवावा. हा व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच शिक्षणाचं महत्त्व काय आहे याची पुन्हा एकदा जाणीव होईल.

हा व्हिडीओ आहे दोन ड्रायव्हरचा, एक ट्रक ड्रायव्हर आहे तर दुसरा ट्रेनचे ड्रायव्हर. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन्ही ड्रायव्हर असले तरी दोघांच्या वाट्याला आलेलं आयुष्य वेगळं आहे. केवळ शिक्षणाच्या फरकामुळे ते दोघेही आपआपल्या जागी आहेत. चांगलं शिक्षण झाल्यामुळे एक उन्हातान्हात कंबर दुखेपर्यंत ट्रक चालवत आहे तर दुसरा व्यक्ती चांगल्या शिक्षणामुळे रेल्वेत नोकरी मिळाली आणि आता आरामदायी पद्धतीत काम करत आहे. हा फरक फक्त आणि फक्त शिक्षणामुळे शक्य झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून प्रत्येकाला कळलंय की शिक्षणाने आयुष्य किती बदलंत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “तुम्हां बघून तोल माझा गेला…” भर रस्त्यात मित्रांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “मित्रांशिवाय आयुष्य नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ _dream_alp_railways नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत, तर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्हिडीओवर देत आहेत.